महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने एप्रिल २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत माढा तालुक्यातील दारफळ सीना येथील केदार प्रकाश बारबोले याने ९०० पैकी ५३३ गुण मिळवत राज्यात ९६ वा क्रमांक पटकावला आहे. त्याची सहाय्यक निबंधक सहकारी संस्था वर्ग-२ पदी निवड झाली आहे. केदार बारबोले याचे प्रार्थामक शिक्षण जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक शिक्षण नवभारत विद्यालय दारफळ सीना येथे झाले. त्याने सांगली येथील वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. सन २००८ साली वडिलांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर आईने मोठ्या कष्टाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत मुलाचे शिक्षण पूर्ण करीत त्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रोत्साहन व प्रेरणा दिली.