दातिवरे हायस्कूलचा प्रवेशोत्सव उत्सा‍हात साजरा..

वैभव पाटील :प्रतिनिधी
दि.१५ जुन२०२२ रोजी दातिवरे शिक्षण संस्था संचलित, दातिवरे हायस्कूल चा शै.वर्ष २०२२ /२३ चा सर्व विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.गेली दोन वर्षे कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेली शैक्षणिक संकुले आज पासुन नियमितपणे सुरू झाली.त्यामुळे सर्व पालक, शिक्षक व शासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.परंतु सगळ्यात उल्लेखनीय बाब म्हणजे विद्यार्थांच्या चेहऱ्यावर शाळेतील पहिल्या दिवसाचा आनंद व उत्साह शब्दातीत होता.कारण मुलांना ही या ज्ञानमंदीराची ओढ लागली होती.दातिवरे हायस्कूल चे मुख्याध्यापक ए.सी.राठोड सरांनी सुट्यामध्येच मुलांचे स्वागत कसे करावे याचे पुर्ण नियोजन केले होते.गेली दोन वर्षात त्यांनी माजी विद्यार्थांना संपर्क करून आपल्या ज्ञानमातेला सहकार्याची गरज आहे ह्याची परिपुर्ण जाणिव करून दिली होती.त्यामुळे अनेक माजी विद्यार्थांनी अनेक हातांनी त्यांच्या आवाहनाला उत्तमप्रकारे प्रतिसाद दिला.त्याचाच एक वैशिष्ट्यं म्हणजे मुख्याध्यापक राठोड सरांनी सन्माननीय शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांच्या आमदार निधीतुन रूपये २५ हजाराचे विज्ञान शैक्षणिक साहित्य मिळवीले.व त्याचे ही अनावरण शाळेतील विज्ञान शिक्षकांच्या हस्ते पहिल्याच दिवशी केले.त्यानंतर शाळेचे माजी विद्यार्थी असलेले व खार्डी गावचे सुपुत्र ज्ञानेश्वर भोईर यांच्या सहकार्याने शाळेच्या पहिल्याच दिवशी सन्माननीय निलेशजी सांबरे साहेब आपल्या पालघर ठाणे जिल्हातील एक अग्रगण्य समाजसेवक व नेतृत्व असणारे जिजाऊ या बहुउद्देशीय सामाजिक संघटनेचे सर्वेसर्वा यांच्या जिजाऊ संघटनेद्वारा दातिवरे हायस्कूल च्या सर्व विद्यार्थांना मोफत वह्या वाटपचा कार्यक्रम घेण्यात आला.सदर कार्यक्रम हा मुलांच्या प्रवेशोत्सवात चार चांद लावणारा ठरला.पहिल्याच दिवशी मुलांना वह्या मिळाल्याने योग्य वेळी योग्य सत्कार्य पार पाडल्याचे समाधान सर्व विद्यार्थांच्या व त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर दिसत होते .जिजाऊ संघटनेची अनेक क्षेत्रात उत्युंग अशी कामगीरी आहे.दातिवरे सारख्या आडवळणी गावापर्यत ज्ञानेश्वर भोईर यांच्या माध्यमाने गरीब ,गरजु व होतकरू मुलांना दिलेल्या या दानाचे अगदी योग्य ठिकाणी वापर झालेला असुन आमच्या या शेकडो कुटुंबांचे शुभाशीर्वाद ह्या जिजाऊ संस्थेला व त्यांचे सर्वेसर्वा सन्माननीय निलेशजी सांबरे साहेबांना लाभले आहेत.अशी अनंत कुटुंबांना अनेक प्रकारे सहकार्याचा हातभार लावत आज जिजाऊ संघटना समाजात कार्यात एक अग्रगण्य संघटना म्हणुन पुढे आली आहे.तसेंच राठोडसरांनी सफाळे येथील उद्योजग पंकज शहा यांच्या कडुन त्यांचे बंधु कै.नैलेश शहा यांच्या स्मरणार्थ दि.१६ तारखेला त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त नविन प्रवेश घेतलेल्या इ.५वीच्या विद्यार्थांना ४० कंपास बॉक्स उपलब्ध करून दिले.या आणि अश्या अनेक प्रकारे आपल्या शाळेच्या अंतर्गत व शैक्षणिक विकासासाठी सतत व अथक परिश्रम करून शाळेचा संस्थेचा व पर्यायाने गावच्या विकासाला हातभार लावत आहेत.अशा अनेक दात्याने मुळे विद्यार्थांचा पहिला दिवस हा स्मरणीय व आनंददायी झाला.अशी परीसरात व गावात मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी हे अगदी तनमन धनाने शाळेसाठी पुढे येतात म्हणुन शाळेच्या विकासाला हातभार लागत आहे.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुशिल ठाकुर सरांनी केले तर आभार प्रदर्शन रूपेश राऊत सरांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here