दातिवरे शिक्षण संस्था संचलित, दातिवरे इंग्लिश हायस्कूल शाळेचा निकाल १००%
वैभव पाटील :प्रतिनिधी
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा दहावी चा निकाल शुक्रवार (दि.१७)रोजी ऑनलाईन पध्दतीने लागला.दातिवरे शिक्षण संस्था संचलित, दातिवरे इंग्लिश हायस्कूल शाळेचा निकाल १००% लागला आहे. एकूण ३१ पैकी ३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असुन या पैकी १४ विद्यार्थी विषेश श्रेणीत, १६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ०१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे शाळेचे मुख्याध्यापक ए.सी. राठोड सर यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे. दातिवरे हायस्कूल या विद्यालयात दातिवरे व खार्डी या गाव खेड्यातील मच्छीमार व शेतकरी कुटुंबातील मुले शिक्षण घेत असुन शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी दातिवरे शिक्षण संस्था विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या गुणात्मक योजना राबवते.त्यामुळे शाळेचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे.
शाळेतुन प्रथम येणारे विद्यार्थी
१) श्रेया राजेंद्र गावड 89.40%
२)(अ) सायली संजय पाटील 88.00%
(ब) प्रेरणा बाळकृष्ण भोईर 88.00%
३) सृष्टी भुवनेश्वर पागधरे 87.00%