दसरा म्हणजे नवी उमेद, नवी आशा – माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील

इंदापूर प्रतिनिधी : संतोष तावरे
दसरा उत्सव हा वाईटावर चांगल्या शक्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. दसरा सण समाजामध्ये नवी उमेद, नवी आशा निर्माण करीत असतो. त्यामुळे प्रत्येकाने नवीन संकल्प करून, जीवनामध्ये सुख-समृद्धी प्राप्त करावी, या शब्दात भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जनतेला विजयादशमी निमित्त शुक्रवारी (दि.15) शुभेच्छा दिल्या.
दसरा हा आंनदाचा, प्रेमाचा उत्सव आहे. आपट्याची पाने, झेंडूची फुले याबरोबर प्रत्येकाच्या जीवनात सुख-समृद्धी घेऊन हा सण आला आहे. एकमेकांवर विश्वास व आपुलकीचे नाते कायम ठेवा, सामाजिक बांधिलकी जपा, एकमेकांना समजून घ्या, सहकार्य करा, माणुसकी जपत जीवन समृद्ध करा, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दसरा सण हा आनंदाचा, भरभराटीचा, वैभवाचा, आरोग्यदायी, मंगलमय जावो व प्रत्येकाच्या जीवनात सुख समृद्धी लाभो अशा शुभेच्छा हर्षवर्धन पाटील यांनी विजयादशमीनिमित्त जनतेला दिल्या आहेत.



 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here