काल शेटफळ हवेली येथील विशाल शिंदे नामक युवकाने व त्याच्या दोन्ही मित्रांनी मिळून निर्जन ठिकाणी संकटात असलेल्या महिलासह बाळाला व पतीला हत्यारबंद दरोडेखोरांच्या तावडीतून सुटका करून त्यांचा जीव वाचवल्याबद्दल त्याचप्रमाणे या युवकांनी धाडसाने दरोडेखोरांचा पाठलाग करून त्यांच्याकडील गुन्ह्यात वापरलेली गाडी ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे धडाकेबाज काम करणाऱ्या विशाल शिंदे याचा शेटफळ हवेलीकरांनी ग्रामदैवत भैरवनाथाच्या मंदिरामध्ये त्याचा सत्कार करण्यात आला.याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 22 जुलै रोजी विशाल शिंदे हा शेटफळ हवेली मधील राहणारा युवक पिटकेश्वर या ठिकाणी आपला मित्र ऋषिकेश पठाडे यांच्या शेतात गेला होता. त्याचे काम संपल्यानंतर काटी ते कचरेवाडी या मार्गातून विशाल शेटफळ हवेलीला निघाला होता विशाल सोबत ऋषिकेश गायकवाड व कांतीलाल आरडे हे त्याचे मित्र देखील होते. विशालला घरी लवकर जायचे होते कारण त्याचा त्या दिवशी वाढदिवसाचा कार्यक्रम होता परंतु रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी काटी ते कचरेवाडी या रस्त्यावर निर्जन ठिकाणी एक महिला,बाळ व पतीसह दरोडेखोरांच्या ताब्यात आहेत व ते त्यांना लुटत आहेत त्यांच्याकडे धारदार कोयता असून ते त्या दापत्यांना इजा पोचू शकतात हा संशय आल्यानंतर या तिघांनी आपली गाडी थांबवली व त्यांच्या मदतीला धावून गेले.
घटनास्थळी विशाल शिंदे व दरोडेखोर यांच्यात शाब्दिक आमना सामना झाला व दरोडेखोरांनी तिथून पळ काढला. दरोडेखोरांनी पळ काढल्यानंतर त्या महिला ओरडली की “माझे सोने व पैसे या दरोडेखोरांनी पळवले आहेत” हे ऐकल्यानंतर ह्या धाडसी तीनही युवकांनी तोंडाला रुमाल बांधलेल्या दरोडेखोरांचा पाठलाग तब्बल 9 किलोमीटर केला. पाठलाग करता करता वरकुटे रोडवर हेगडे वस्ती ते यादव वस्ती दरम्यान चोरांनी दूचाकी युनिकॉर्न गाडी सोडून अंधाराचा फायदा घेऊन शेतात पळून गेले. चोर पळून जाताना जी दुचाकी होती तीही परवाच चोरी केलेली असल्याने संबंधित मूळ मालकाला ती गाडी मिळाली व या युवकांच्या धाडसामुळे बाळासह महिला व तिच्या पतीचा जीव वाचला.विशाल शिंदे यांनी केलेल्या याच फिल्मी स्टाईल धाडसाची शेटफळकरांनी दखल घेऊन आज ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरामध्ये त्याचा आदरपूर्वक सत्कार केला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे,माजी सैनिक दरेकर साहेब,बाळासाहेब पवार,वसंत क्षीरसागर, दिपक शिंदे,सचिन पुंडे,भारत ढोबळे,प्रवीण मोरे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
Home Uncategorized दरोडेखोरांपासून महिला, बाळाचे संरक्षण करीत दरोडेखोरांचा फिल्मी स्टाईल पाठलाग करणाऱ्या विशाल...