इंदापूर: चांगल्या लोकांचे रक्षण करणे आणि दुष्टांचा नाश करणे महाराष्ट्र पोलीस दलाचे हे ब्रिदवाक्य असून ते सार्थ करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अहोरात्र आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असतात. आपल्या देशाचे संरक्षण करणारे सरहद्दीवर अहोरात्र पहारा देणारे भारतीय सैन्यदल आहे म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. त्याचप्रमाणे देशांतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र पहारा देणारे आमचे पोलीस दल म्हणूनच तर आम्ही शांतपणे रात्रीची झोप घेऊ शकतो, सण उत्सव साजरा करू शकतो. सध्या बारामती विभागात डी वाय एस पी गणेश इंगळे हे पोलीस खात्यातील कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जातात.त्यांचे नाव उच्चारताच मोठ-मोठ्या गुन्हेगारांच्या उरात धडकी भरते. प्रामाणिक माणसाला मात्र ते खाकी वर्दीतील देव माणूस वाटतात. खाकी वर्दीतील माणूसकीचा झरा सतत वाहत ठेवत हा खाकी वर्दीतील देव माणूस प्रसंगी स्वत:ची पदरमोड करून गोर-गरीबांच्या मदतीला धावून जाणारा अधिकारी म्हणजे डी वाय एस पी गणेश इंगळे हे आहेत.गणेश इंगळे यांनी 25 सप्टेंबर 2021 रोजी बारामती विभागात डी वाय एस पी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री डॉ. अभिनव देशमुख साहेब व अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विभागातील अवैद्य धंदे मटका व्यवसाय, जुगार व्यवसाय, अवैद्य वाळू वाहतूक ,याचबरोबर वेश्या व्यवसाय पूर्णपणे बंद केलेला असून गणेश इंगळे यांनी आपल्या कर्तव्य बरोबरच अनेक समाजातील सामाजिक कार्य केले आहेत. 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कर्तव्यदक्ष डी वाय एस पी गणेश इंगळे व त्यांच्या पत्नी इंगळे मॅडम यांच्या उपस्थितीत बारामती येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. वृक्षरोपणाचे व पर्यावरणाचे महत्व सांगून प्रत्येकाने वृक्षारोपण केले पाहिजे असे आवाहन ते नेहमी करतात .तसेच पर्यावरण विषयावर मार्गदर्शन करतात . त्यांनी डी वाय एस पी पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून सावकारांचे धाबे दणाणले आहेत .त्यांनी अनेक लोकांना सावकारांच्या तावडीतून त्यांचे घरे , जमिनी गेलेल्या परत मिळवून दिल्या आहेत .सर्वसामान्य जनतेला ते नेहमी आवाहन करतात कि,सावकारकी मध्ये कोण अडकलेले लोक असतील, सावकार पिळवणूक करत असेल, दमबाजी करत असेल, जगणेच मुश्कील करत असेल ,तर अशा लोकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन देखील ते करत असतात. इंगळे यांच्या बाबतीत बारामती विभागातून गोरगरीब जनतेचा देव माणूस म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. एक दबंग अधिकारी म्हणून त्यांचे नाव आहे. साहेबांचे कार्य इतके अनमोल आहे की काही अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी आपले अवैद्य व्यवसाय बंद करून दुसरा व्यवसाय निवडला असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहण्यास मिळत आहे. बारामती विभागात साहेब यांनी न्याय देण्याचे कार्य अत्यंत सूक्ष्मपणे केले असून त्यांच्या पुढे न्याय देताना कोणताही भेदभाव नसतो, तक्रारदार लहान असो किंवा मोठा त्यांना न्याय समानच मिळतो. गणेश इंगळे डी वाय एस पी यांची आज बारामती विभागात अल्प कालावधीत लोकप्रिय कर्तव्यदक्ष दबंग अधिकारी आणि वर्दीतील देव माणूस अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. “मुझे अभिमान है इसका कि मैं हूं अंग वर्दी का,बड़ी किस्मत से मिलता है ए खाकी रंग वर्दीका” असे म्हणणाऱ्या या कर्तव्यदक्ष सिंघम अधिकाऱ्याला जनता एक्सप्रेस मराठी न्यूज कडून पुढील देशसेवेसाठी हार्दिक शुभेच्छा…