इंदापूर(प्रतिनिधी):शहाजीनगर येथील दत्त देवस्थानात अनेक वर्षापासून गुरुचरित्र,अखंड सुरू ठेवले आहे.इंदापूर तालुक्यातील भक्तगणांना गुरुचरित्र पारायणाच्या माध्यमातून,आध्यात्मिक गोडी निर्माण होत असल्याची माहिती, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी दिली.दत्त देवस्थान शहाजीनगर येथील गुरुचरित्र पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहातील(ता.२२ डिसेंबर) शुक्रवार रोजी श्रींची पहाटेची महापूजा कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा,शहा परिवाराचे सर्वेसर्वा मुकुंद शहा,इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता शहा तसेच युवा उद्योजक अंगद शहा या उभयतांच्या हस्ते पार पडली.देवस्थानच्या वतीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नीलकंठ मोहिते तसेच देवस्थानचे प्रमुख तानाजीराव गायकवाड यांनी स्वागत केले.संत गुलाब बाबा मूर्तीची महापूजा युवा उद्योजक अंगद शहा यांनी केली.मानवी जीवनात आनंद मिळवण्यासाठी अध्यात्माची नितांत गरज असून,यासाठीच अखंड हरिनाम सप्ताह वरदान ठरतात.तालुक्यातील व परिसरातील नागरिकांनी हरिनामाचा अखंड लाभ घ्यावा असे आवाहन भरत शहा यांनी केले.दत्त देवस्थान मध्ये धार्मिक सांस्कृतिक,सामाजिक उपक्रम सातत्याने होतात.त्यामुळे युवा वर्गाला दत्त देवस्थान आदर्शवत ठरले आहे.असे गौरवोद्गार इंदापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी काढले.