इंदापुर:आज इंदापूर पोलीस स्टेशन येथे बहुजन मुक्ती पार्टी च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून एक निवेदन देण्यात आले आहे या निवेदनामध्ये विस्तृत स्वरूपात असे लिहिले आहे की ,महाराष्ट्र मध्ये अनेक सरकार सत्तेवर येत असताना विज बिल माफीचा तसेच मोफत वीज देण्याचा नारा देऊन सत्तेवर येत असतात. परंतु सत्तेमध्ये आल्यानंतर वीज बिलाच्या संदर्भामध्ये, वीज बिलाच्या आकारणीच्या संदर्भामध्ये, वीज मोफत देण्याचा संदर्भामध्ये एक ही सरकार आजपर्यंत महाराष्ट्र मध्ये बोलताना दिसत नाही. या उलट महाराष्ट्रामध्ये जे सरकार बनले आहेत, त्या सरकारने सामान्य विज ग्राहकांची मोठ्या प्रमाणामध्ये वीज शुल्क आकारून लूट केली आहे. त्याच्यामध्ये शेतकरी असतील, घरगुती वीज कनेक्शन असेल, व्यापारी असतील या सर्वांची लूट वेगवेगळी सरकार करत सध्या विज कनेक्शन तोडणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.त्यामुळे जनसामान्याची दिवाळी अंधारातच झाली आहे. किमान सणासुध्दीच्या काळात तरी सरकारने विज कनेक्शन कापुन जनतेचा अंत पाहु नये. थकीत विजबिलामुळे सुरू असलेली विज कनेक्शन तोडणी तात्काळ थांबवण्यात यावी. याकरीता बहुजन मुक्ती पार्टी बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी व बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात येत आहे.
प्रमुख मागण्या :
1) थकीत वीजबिलामुळे सरकार तर्फे सुरू असलेली विज कनेक्शन तोडणी तात्काळ थांबवावी.
2) २०० युनिट पर्यंत चे वीज बिल माफ करण्यात यावे.
3) मीटर भाडे कपात करण्यात यावे.
4) सक्ती ची वीजबिल वसुली तत्काळ थांबवावी.
वरील मागण्या जर मान्य झाल्या नाही तर बहुजन मुक्ती पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी व बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडीच्या वतीने महाराष्ट्रात चरणबद्ध आंदोलन करण्यात येईल.
आंदोलनाचे चरण:
१) दि.03 नोव्हेंबर 2021 निवेदन देणे.
२) दि.10 नोव्हेंबर 2021 लाईट बिल जलाओ आंदोलन
3) दि.20 नोव्हेंबर 2021 जेलभरो आंदोलन
4) दि.07 डिसेंबर 2021 मा.ऊर्जामंत्री यांच्या घराला घेराव.
अशा पद्धतीने या प्रमुख मागण्या असलेले निवेदन सर्व कार्यकर्त्यांनी मिळून इंदापूर पोलिस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक मुजावर साहेब यांच्याकडे देण्यात आले. आता यानंतरच्या काळात या प्रमुख मागण्या बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी व महिला आघाडी यांच्या वतीने देण्यात आले आहे .यावेेळी ऍड.राहुल मखरे,संजय (डोनाल्ड) शिंदे, ऍड.किरण लोंढे, बाबाजी भोंग, संतोष क्षिरसागर, सुरज धाईंजे, नानासाहेब चव्हाण, काकासाहेब जाधव,गौष सय्यद, भारत मिसाळ, आकाश साळवे, रोहित ढावरे, नितीन देशमाने, अक्षय मखरे,सुरज मखरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.आता शासन याबााबत योग्य दखल घेईल का ?विजबिल संदर्भात सर्व प्रश्न सुटतील का ? 7 डिसेंबर रोजी ऊर्जा मंत्री यांच्या घराला घेराव घालण्याची वेळ येईल का? हे काही दिवसात समजेल.