भिगवण दि.२२ (प्रतिनिधी) :मदनवाडी येथील तेजस एकनाथ देवकाते यांची पुणे जिल्हा भाजपच्या चिटणीसपदी निवड झाली आहे. तेजस देवकाते हे भाजपच्या इंदापूर तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून यापूर्वी कार्यरत होते. ते सध्या मदनवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी दुसऱ्यांदा कार्यरत असून यापूर्वी त्यांनी मदनवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद भूषविलेले आहे. युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी प्रभावीपणे काम केलेले असून निर्मल वारी अभियान, विविध आंदोलने,मन की बात, परीक्षा पे चर्चा,हर घर तिरंगा अभियान, तिरंगा रॅली,रक्तदान शिबिरे पक्ष नेतृत्वाने दिलेली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडले तसेच कुस्ती स्पर्धा ,दहीहंडी महोत्सव यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन त्यांनी केले आहे.तालुक्यातील प्रभावी युवा कार्यकर्ता, उत्तम संघटन कौशल्य, सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांशी असलेला थेट जनसंपर्क आणि लढाऊ वृत्ती या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.त्यामुळे पक्षाला त्यांच्या निवडीचा फायदा होणार आहे. निवडीमुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.मा.मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या नेतृत्वात देवकाते यांना काम करण्याची संधी यानिमित्ताने मिळालेली आहे. त्यामुळे आता सामान्य कार्यकर्त्यालाही भाजपामध्ये चांगली संधी निर्माण होऊ शकते याचे चांगले उदाहरण तेजस देवकाते यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याला मिळाले आहे.
“पक्षाने दिलेल्या संधीचा फायदा घेऊन युवकांची मजबूत फळी भाजपसोबत उभी करण्याचा निर्धार केला असून युवा मोर्चाच्या माध्यमातून केलेल्या कामाची पावती म्हणून फादर बॉडी मध्ये नियुक्ती मिळालेली आहे. माजी मंत्री मा. हर्षवर्धन पाटील साहेब यांनी युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षपदी तसेच आता जिल्हा सचिवपदी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.“- तेजस देवकाते, सचिव, भाजप पुणे जिल्हा