तालुकास्तरीय नियोजन समितीवर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महिंद्रदादा रेडके यांचा तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने सत्कार

इंदापूर: इंदापूर पंचायत समिती येथे स्वच्छता व पर्यावरण तज्ञ तसेच जिल्हा नियोजन समिती ग्रामपंचायत व तालुकास्तरीय समित्या यांच्यात समन्वय साधण्यासाठी तालुकास्तरीय अध्यक्षपदी महेंद्र रेडके यांची निवड झाल्याबद्दल पंचायत समिती येथे तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने पंचायत समिती सदस्य प्रदीप मामा जगदाळे यांच्या हस्ते व सभापती सौ स्वातीताई शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिंद्र रेडके यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता.
यावेळेस तेजपृथ्वी ग्रुपचे मार्गदर्शक नानासाहेब खरात म्हणाले की,”आज इंदापूरमध्ये तळागाळातील माणसाला गोरगरिबाला विद्यार्थ्यांना व कष्टकऱ्यांना काही अडचण आली तर समोर एकच नाव येते ते म्हणजे महिंद्र रेडके यांचे त्यांची या समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली याबद्दल अतिशय योग्य असा माणूस शासनाने निवडला” पुढे ते म्हणाले की “दादा सकाळी 11 वाजता पंचायत समिती ऑफिसला येतात ते 6 वाजता जातात. त्यामुळे बाहेरगावाहून येणारा माणूस मग तो कोणत्याही गावातला असो त्याचं काम मार्गी लावण्या साठी दादा शंभर टक्के प्रयत्न करतात.” रेडके यांना तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या , यावेळेस इंदापूर पंचायत समितीचे सदस्य काळेसाहेब,तेजपृथ्वी ग्रुपचे गणेश शिंगाडे प्रसाद पाध्ये ,दुर्योधन पाटील ललेंद्र शिंदे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश आरडे, शिवशाही संघटनाचे अध्यक्ष नितीन आरडे,हनुमंत यमगर व इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here