तरंगवाडी ग्रामपंचायत सरपंच पदी दिपाली महादेव वाघमोडे यांची बिनविरोध निवड.

तरंगवाडी ग्रामपंचायत सरपंच पदी दिपाली महादेव वाघमोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.कान्होपात्रा जाधव यांनी सरपंच पदाच्या राजीनामा दिलेमुळे सदर जागा रिक्त झाली होती.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिन करगळ यांनी काम पाहिले. यावेळी उपसरपंच कांतीलाल तरंगे सदस्य सविता कांतीलाल बुणगे, कान्होपात्रा गोविंद जाधव, स्वाती तुकाराम करे, मुक्ता यशवंत यशवंत तरंगे, चैत्राली अण्णासाहेब तरंगे, आप्पासाहेब तात्याराम शिंदे सदस्य,सुहास बुटे तसेच ग्रामसेवक दादासाहेब वाघ उपस्थित होते.निवडीनंतर सरपंच दिपाली वाघमोडे यांचा ग्रामस्थांच्या वतीने यशवंत प्रहार संघटनेचे अध्यक्ष डॉ.शशिकांत तरंगे,विकास सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब चितळकर,माजी सरपंच बबन बुटे,अजिनाथ तरंगे यांनी सत्कार केला.निवडीनंतर गावच्या सर्वांगीण विकासासाठी कोणतेही राजकारण न करता सर्वांना बरोबर घेऊन प्रयत्न करणार असल्याचे सरपंच दिपाली वाघमोडे यांनी यावेळी सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here