तब्बल 650 हून अधिक साखर कारखान्यांच्या संघटनेच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षपदी अंकिता पाटील ठाकरे

👉 ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशनच्या (इस्मा) कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षपदी अंकिता पाटील ठाकरे यांची आज पुनश्च एकदा निवड झाली आहे.
👉 या समितीवर निवड होणाऱ्या अंकिता पाटील ठाकरे या सर्वांत तरुण सदस्या व पहिल्या महिला आहेत.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशन ही भारतातील प्रमुख साखर संस्था आहे. हे देशातील सरकार व साखर उद्योग यांच्यातील संबंध प्रस्थापित करते. देशातील खाजगी साखर कारखान्यांचे कामकाज सरकारी धोरणांद्वारे चालते याची खात्री करणे हा मुख्य उद्देश आहे.
ही संघटना 1932 मध्ये स्थापन झालेली भारतातील सर्वात जुनी औद्योगिक संघटना आहे. ही 650 पेक्षा जास्त सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील साखर कारखान्यांचा समावेश असलेली औद्योगिक संघटना आहे. सध्याच्या ISMA सदस्यांची संख्या भारतात उत्पादित एकूण साखरेच्या 50% + आहे आणि सदस्यत्व भारतातील प्रमुख साखर उत्पादक राज्यांमध्ये आहे. ISMA विशेषत: साखर उत्पादकांच्या फायद्यासाठी आणि हितासाठी भारत सरकार आणि स्थानिक राज्य सरकारसोबत समन्वय करते.अंकिता पाटील ठाकरे यांचं शिक्षण परदेशात झालेलं आहे. त्या सध्या शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा व पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. अंकिता पाटील ठाकरे या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले आहेत. तसेच जिजाऊ फेडरेशनच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण करणे व युवक-युवतींना विविध माध्यमातून प्रोत्साहित करण्याचे कार्य त्या करीत आहेत.


” या पदाच्या माध्यमातून साखर उत्पादकांच्या फायद्यासाठी आणि हितासाठी, भारत सरकार आणि राज्य सरकारकडे साखर उत्पादनाशी संबंधित समस्यांवर मार्ग काढण्यासाठी पाठपुरावा करणार “
– मा.अंकिता पाटील ठाकरे-


 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here