तथाकथित मोदी नावाच्या व्यक्तीला भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. जर मोदी नावाचा माणूस मिळून आला नाही तर नक्कीच माझ्यावर कारवाई करा, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.नागपूर विमानतळावर मुंबईला जाण्यापूर्वी माध्यमांशी बोलत होते.
भंडारा पोलिसांनी तथाकथित मोदीला पकडलेले आहे. तक्रारकर्ते आणि नागरिकांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. लोकांनी मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार केली नसेल आणि त्या नावाचा गावगुंड नसेल तर नक्कीच माझ्यावर कारवाई करा, असे नाना पटोले यांनी सांगितले.
पटोले यांनी म्हणाले की, मी काही भाषण देत नव्हतो. मी लोकांचे गाऱ्हाणे ऐकून त्यांच्याशी बोलत होतो. या प्रकरणात भंडारा पोलीस कारवाई करत आहे. मी भाषणात बोलत नव्हतो. मात्र, मी लोकांशी संवाद साधत होतो. त्यांच्याशी चर्चा करत होतो. यावेळी त्या गुंडांबद्दल बोललो आहे. लोकांची त्या गुंडापासून भीती काढण्यासाठी असे बोलत होतो. पंतप्रधान पदाची गरिमा काँग्रेस पक्षाला माहित आहे. प्रधानमंत्री पदाची गरिमा कायम ठेवून सन्मान करण्याचे काम काँग्रेस करेल, असेही नाना पाटोले म्हणाले.