प्रतिनिधी: महेश सूर्यवंशी
दौंड, ता.दौंड. मध्ये डोळ्यात मिरची पूड टाकून व्यावसायिकाला लुटणाऱ्या टोळीस दौंड पोलिसांनी जेरबंद केले.दि 29 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 7 वाजता चे सुमारास कांतीलाल पारसीया व मुलगा हे काष्टी येथील दुकान बंद करून दौंड कडे जात असताना सोनवडी गावचे हद्दीत धनश्री बिअर बार समोर काही अज्ञात इसमानी त्यांची दुचाकी अडवून त्यांचे डोळ्यात मिरची पावडर टाकून त्यांचे ताब्यातील 2,50,600 रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला होता. सदर घटने बाबत दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास करीत असताना कार्यतत्पर दौंड पोलिसांचे हाती काही पुरावे मिळून आले, सदर पुराव्यांचे आधारे तपास केला असता गोपनीय बातमीदारमार्फत मिळाले माहिती नुसार सदरचा गुन्हा हा ओमकार वाघमोरे, वय 19 वर्षे,सिद्धार्थ आकोटे ,वय 21 वर्षे,समद तांबोळी,वय 24 वर्षे,सागर धेंडे वय 23 वर्षे हे सर्व रा. काष्टी, ता.श्रीगोंदा, जि. अहमदनगर येथील आहेत. त्यांचे इतर साथीदार यांचे सोबत मिळून केला असल्याचे निष्पन्न झालेने त्या तिघांना गुन्ह्याचे तपास कामी ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांचे कडून इतर आरोपी बाबत व गुन्ह्यात चोरी केलेल्या मुद्देमाल बाबत माहिती काढण्याचे काम चालू आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शना खाली दौंड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विनोद घुगे,पोलीस उप निरीक्षक शहाजी गोसावी,पो.उप.नि महेश आबनावे,पो.हवा सुभाष राऊत, पो.ना अमोल गवळी,पो.ना निखिल जाधव, पो.ना.आदेश राऊत,पो.कॉ अमोल देवकाते, पो.कॉ अभिजित गिरमे,पो.कॉ रवी काळे यांनी केली असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेश आबनावे हे करीत आहेत.
Home ताज्या-घडामोडी डोळ्यात मिरची पूड टाकून व्यावसायिकाला लुटणाऱ्या टोळीस दौंड पोलिसांनी केले जेरबंद..