सणसर: इंदापूर तालुक्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ठिकठिकाणी उत्साहात साजरी होत आहे.आज इंदापूर तालुक्यातील सणसर या ठिकाणी सुद्धा मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. या जयंतीच्या निमित्ताने युवा नेते राजवर्धन पाटील यांनी महामानवास अभिवादन केले.अभिवादन करताना आपल्या भाषणात युवा नेते राजवर्धन पाटील म्हणाले की,”गरिबांसाठी लढण्याबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचा आर्थिक आणि सामाजिक कणा मजबूत करण्यासाठीही योगदान दिले आहे. अर्थशास्त्र आणि राजनैतिक क्षेत्रातही त्यांनी खूप मोलाचे काम केले.भारतीय संविधानाचे ते शिल्पकार होते. त्यांनी महिलांच्या आणि मजुरांच्या हक्कांसाठी लढा दिला. देशातील अस्पृश्यता दूर करण्यासाठी आणि सर्वांना समान न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी शेवटपर्यंत लढा दिला अशा या महामानवाची जयंती आज आपण सणसर येथे मोठ्या उत्साहात साजरी करत आहात याचा आनंद वाटत आहे.मिरवणूकही अशाच पद्धतीने शांततेतच पार पाडा” अशी विनंतीही यावेळी राजवर्धन पाटील यांनी भीमसैनिकांना दिली. यावेळी सणसर पंचक्रोशीतील असंख्य युवक हजर होते.
Home Uncategorized डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे देशाचा आर्थिक आणि सामाजिक कणा मजबूत करण्यासाठी मोठे योगदान –...