डॉ.कदम गुरुकुल इंदापूर 17 वर्षे वयोगटाच्या(मुली) बेसबॉल संघाची वर्धा येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये विजयी सलामी.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा व जिल्हा क्रीडा परिषद वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन वर्धा जिल्हा या ठिकाणी केले होते.मंगळवार दि. 17 ते 19 जानेवारी 2023 रोजी 17 वर्षे वयोगटामध्ये पुणे विभागीय संघाचे नेतृत्व करीत असलेल्या डॉ. कदम गुरुकुल इंदापूर मुलींच्या संघाने प्रथम फेरीत औरंगाबाद विभागीय संघाचा 6/0 ने पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये कोल्हापूर विभागीय संघाचा 13/0 ने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.अंतिम सामना हा पुणे जिल्हा विरुद्ध अमरावती विभागीय संघ या संघामध्ये खूप चुरशीची लढत होऊन पुणे विभागीय संघाने अमरावती विभागीय संघाचा 14/1 ने पराभव करून जिल्हास्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकाविले. या संघामध्ये असणारे खेळाडू डॉ.कदम गुरुकुल मधील प्रशस्त मैदानावरती वर्षभर सराव करीत असतात. त्यामुळे या वर्षी डॉ. कदम गुरुकुल चे तीन संघ हे विभागीय स्पर्धा जिंकून राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये पोहोचले आहेत. त्यातील 17 वर्षे वयोगटा तील मुलींनी संबंधित स्पर्धा जिंकून राज्यस्तरावरती विजयाची सुरुवात करून दिली आहे. या स्पर्धेतील विजयी खेळाडू दूर्वा भोंगळे,श्रद्धा कांबळे, हर्षदा सावंत,सानिका जाधव,अनन्या देशपांडे,श्रीलेखा देवकर,अक्षरा बरगंडे,समृद्धी जाधव,अरीबा खान,सिद्धी पाटील, वैष्णवी रणवरे,मनवा पोटे,प्राची कोरे, अस्मि राऊत,आर्या चव्हाण या खेळाडूंचे आणि मार्गदर्शक क्रीडाशिक्षक सोमनाथ नलवडे अपर्णा बुरले ांचे पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे साहेब,इंदापूर तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले साहेब यांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. एल. एस. कदम सर संस्थेच्या शैक्षणिक संचालिका डॉ. सविता कदम मॅडम,सचिव नंदकुमार यादव सर,गुरुकुलच्या प्राचार्या वृंदा मुलतानी जोशी, उपप्राचार्य ऋषी बासू, कनिष्ठ विभाग प्रमुख अनिता पराडकर मॅडम,स्कूल मॅनेजर संदीप जगताप सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस यश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here