डॉ.कदम गुरुकुल इंदापूर 14 वर्षे वयोगटाच्या(मुली) सॉफ्टबॉल संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

शैक्षणिक, विज्ञान,राजकारण आणि आता क्रीडा कोणत्याच क्षेत्रात मुली ह्या कमी पडत नाहीत. गेल्या चार वर्षांपूर्वी अमीर खानचा एक हिंदी चित्रपट रिलीज झाला होता दंगल नावाचा.आणि त्या चित्रपटात एक हरियाणी डायलॉग फेमस झाला होता तो म्हणजे “म्हारी छोरियां छोरो से कम है के” याचाच अर्थ आमच्या मुली मुलांप्रमाणेच कर्तुत्वाला कोठेच कमी नाहीत.आणि अगदी याच डायलॉगचा पुन्हा आठवण डॉक्टर कदम गुरुकुल येथील मुलींनी करून दिली. गेल्या आठवड्यातच याच शाळेतील मुलांनी लहान व मोठ्या अशा दोन्ही वयोगटात विजेतेपद पटकवत राज्यस्तरापर्यंत पोहोचले आहेत. आणि आता क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर या ठिकाणी केले होते. मंगळवार दि.10,11 जानेवारी 2023 रोजी 14 वर्षे वयोगटामध्ये पुणे जिल्ह्याचे नेतृत्व करीत असलेल्या डॉ. कदम गुरुकुल इंदापूर मुलींच्या संघाने प्रथम फेरीत पिंपरी चिंचवड शहर संघाचा 9/2 ने पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये सोलापूर संघाचा 5/2 ने पराभव करून अंतिम फेरी प्रवेश केला.अंतिम सामना हा पुणे जिल्हा विरुद्ध अहमदनगर जिल्हा ग्रामीण या संघामध्ये खूप चुरशीची लढत होऊन पुणे जिल्हा संघाने अहमदनगर जिल्हा संघाचा 14/4 ने पराभव करून विभागीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकाविले.गेल्याच आठवड्यात कदम गुरुकुलच्याच विद्यालयाचे विद्यार्थी(मुले) बेसबॉल स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर पोहोचले होते आणि आता मुलींनीही यशाचे शिखर गाठल्याने त्या कौतुकास पात्र होत आहेत. डॉ.कदम गुरुकुल इंदापूर 14 वर्षे मुलींचा संघ सातारा जिल्हा या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये पुणे विभागाचे नेतृत्व करणार आहे.सदर संघाचे खेळाडू अस्मि नितीन राऊत,तनया सचिन पवार, प्रगती संदीप जगताप,स्वरा तुषार गुजर,आर्या विकास चव्हाण, श्रावणी महादेव जाधव, शरवली ज्ञानेश्वर देवकर, ऋतुजा सोनबा गिरी, आद्या सचिन बिचकुले, यज्ञा अभिजीत पाटील, वैष्णवी योगेश रणवरे, प्राची विजय शेवाळे, मेहेक विपुल लोढा या खेळाडूंचे आणि मार्गदर्शक क्रीडाशिक्षक सोमनाथ नलवडे यांचे सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर साहेब,इंदापूर तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले साहेब यांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. एल. एस. कदम सर संस्थेच्या शैक्षणिक संचालिका डॉ. सविता कदम मॅडम,सचिव नंदकुमार यादव सर,गुरुकुलच्या प्राचार्या वृंदा मुलतानी जोशी, उपप्राचार्य ऋषी बासू, कनिष्ठ विभाग प्रमुख अनिता पराडकर मॅडम,स्कूल मॅनेजर संदीप जगताप सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. अशा या कर्तुत्वान मुलींचे व शाळा व शाळा समितीचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि ग्रामीण भागातील एक शाळा काय करू शकते याचा एक उदाहरण देऊन जात आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here