डासांची विल्हेवाट लावूया, डेंग्यूला हद्दपार करूया !!! हे सूत्र हाती घेऊन डेंगू आजार कमी करण्यासंदर्भात निमगाव केतकी प्रशासनाकडून काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. निमगांव-केतकी परिसरात सर्वत्र डेंग्यू आजाराचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी निमगांव-केतकी गावठाण व आपल्या वाड्या-वस्तीवरील भागात औषध फवारणी करण्याच काम हाती घेतलेले आहे. आजून ज्या भागात औषध फवारणी राहिलेली आहे.त्याठिकाणी त्वरित करून घेण्यात येईल अशी सरपंच प्रविण डोंगरे यांनी निमगाव केतकी मधील सर्व ग्रामस्थ सांगितले.
डेंग्यूपासून सावध राहण्यासाठी काय करू शकतो? सरपंचांनी दिलेल्या काही टिप्स:-
आपल्या घरातील पाण्याची भांडी व्यवस्थित झाकावे.आपल्या फुलदाणी, कुंडी – मनिप्लांट ई. पाणी नियमितपणे बदलावे.खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या बसवाव्या.बिल्डिंगवरील पाण्याच्या टाक्या व्यवस्थित झाकाव्या.ज्यांचे घरी सेफ्टी संडास आहे. त्या सेफ्टी संडासच्या वेंट पाईप ला जर पातळ कपड्याची (उदा० साडीचा पातळ कपडा किवा ओढणी ) जाळी संडासच्या पाईपला बांधली तर, जी डासांची उत्पत्ती सेफ्टीक टँक मध्ये होते व ते डॉस ( मच्छर) सेफ्टीक टँक मधून पाईप च्या माध्यमातून बाहेर पडतात. जर आपण संडासच्या वेंट पाईपला जर जाळी बसविली तर डास त्या जाळीमध्ये अडकून मरतील. व डासांची उत्पत्ती थांबेल. व डेंग्यू मलेरिया या रोगाला आळा बसेल. अशा टिप्स सरपंच यांनी ग्रामस्थांनाा दिल्या. त्यामूळे आपल्या कुटूंबाच्या सुरक्षिततेसाठी व गावाच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येकाने आपल्या संडासच्या पाईपला कापड जाडी बांधावी. अशाप्रकारे मार्गदर्शक सूचनाही निमगावकरांना देण्यात आलेले आहेत.