टेल टू हेड या कायद्यासाठी रक्तरंजित लढाईत उतरा : अतुल खूपसे पाटील

प्रतिनिधी प्रतिनिधी: देवा कदम
👉 लोकप्रतिनिधी व अधिकारी टेल टू हेड कायद्याला पायदळी तुडवड असल्याचा  घणाघत.
करमाळा: ४०-४५ वर्षापूर्वी स्व. यशवंतराव चव्हाण यांनी स्व. शंकरराव मोहिते पाटील  व स्व. नामदेवराव जगताप यांच्या साक्षीने उजनी जलाशयाची बांधणी केली. या जलाशया साठी करमाळा तालुक्यातील शेकडो एकर क्षेत्र पाण्याखाली गेले. मात्र यशवंतरावांच्या आवाहनाला शेतकऱ्यांनी भरभरून साथ दिली आणि उजनी ची निर्मिती झाली. मात्र ज्या करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या तोच तालुका शेतीच्या नव्हे तर पिण्याच्या पाण्यासाठी देखील तहानलेला आहे. त्यामुळे दहिगाव व कुकडी उपसा सिंचन या योजनेमधून टेन टू हेड या कायद्यानुसार पाणी मिळवण्यासाठी रक्तरंजित लढा उभा करू असे प्रतिपादन जनशक्ती चे नेते अतुल खूपसे पाटील यांनी केले.वरकुटे (ता. करमाळा) येथे जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी मेळावा आयोजित केला होता यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर नितीन जगताप, सुरज धोत्रे, मोहन गायकवाड, गणेश गुंडगिरे, पपू कोळी, सुरेश डोलारे, अक्षय शिंदे, नयन मस्के, राजाभाऊ डोलारे, समाधान डोलारे, रामराजे डोलारे, राणा वाघमारे,चंदू डोलारे, बप्पा डोलारे, महेश डोलारे, रघुनाथ शिंदे आदी उपस्थित होते.पुढे बोलताना खूपसे म्हणाले की, विद्यमान आमदाराचे कार्यकर्ते टेल टू हेड या नियमाला तिलांजली देत जेसीबी मशिनच्या साह्याने कॅनल फोडून सोयीने आणि सवडीने पाणी घेत आहेत. या दादागिरीला अधिकारीदेखील पाठिंबा दर्शवीत याकडे कानाडोळा करतात. कॅनल फोडणारे आमदार महोदय यांचे कार्यकर्ते असल्याने सामान्य शेतकऱ्यांनी तक्रार कुणाकडे करायची असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ही दादागिरी मोडून काढण्यासाठी शेतकर्‍यांनी संघटित होऊन आपल्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी लढ्यात उतरले पाहिजे असे आवाहन त्यांनी शेवटी केले.यावेळी अमोल डोलारे,गणेश डोलारे, रामा डोलारे, रामा आडसुळ, अविनाश डोलारे, बापूराव शिंदे,सोयब पठाण, मारुती शिंदे, विलास सुकळे, लखन शिंदे, अजिंक्य जगदाळे, जाकिर मुलाणी, किशोर शिंदे,बालाजी तरंगे, निखिल सरडे, अक्षय शिंदे ,सागर शिंदे, पांडुरंग शिंदे,शरद एकड , आजित सयद, दिलीप देशमुख, शिकील शेख, बालाम शेलार,कल्याण गवळी,अमीर मुलाणी आदींसह शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here