हर्षवर्धन पाटील यांनी घेतले जोधपुरी बाबांच्या दर्गाहचे दर्शन
– लुमेवाडीचा उरूस उत्साहात
इंदापूर: प्रतिनिधी दि.28/10/21
लुमेवाडी (ता.इंदापूर) येथील प्रसिध्द हाजी हाफिज फत्तेह मोहम्मद जोधपुरी बाबांच्या दर्गाहचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांनी गुरुवारी (दि.28) दर्शन घेतले. दरम्यान, जोधपुरी बाबांचा उरूस उत्साहात संपन्न झाला.
महाराष्ट्रामध्ये जोधपुरी बाबांचा दर्गाह प्रसिद्धीस आलेला आहे. जोधपुरी बाबांचे आशीर्वाद आपले सर्वांच्या पाठीशी कायम राहिलेले आहेत. जोधपुरी बाबांच्या दर्गाहच्या व परिसराच्या विकासासाठी आपण यापूर्वी सहकार्य केलेले आहे तसेच आगामी काळातही लागेल ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी स्पष्ट ग्वाही यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी दर्गाह ट्रस्टच्या वतीने हर्षवर्धन पाटील व अप्पासाहेब जगदाळे तसेच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
जोधपुरी बाबांच्या ऊरूसाचे हे 27 वे वर्ष आहे. उरूसानिमित्त दर्गाहला अतिशय आकर्षक पध्दतीने विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.