करमाळा:(प्रतिनिधी:हनुमंत निमगिरे) करमाळा तालुक्यातील जेऊर येथे आज मंगळवार दिनांक ०८ मार्च २०२२ रोजी शिवजयंती निमित्त शिवचरित्रकार व्याख्याते प्राध्यापक नितीन बानगुडे-पाटील यांचे व्याख्यान सायंकाळी ०७ वाजता आणि शिवशाहीर सम्राट डॉ देवानंद माळी यांचा पोवाडा सायंकाळी ०५ ते ०७ दरम्यान होणार आहे.यविषयी सविस्तर माहीत अशी का, दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी छत्रपत्री शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती जेऊर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ८ तारखेला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम येत्या मंगळवारी जेऊर येथील बाजारतळाचे भव्य पटांगणावर होणार असुन माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीचे सर्व सदस्य, जेऊर ग्रामपंचायत व ग्रामस्थ तसेच मा.आ. नारायण पाटील व मा.पै.पृथ्वीराज भैया पाटील मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील शिवप्रेमींनी तसेच श्रोत्यांनी उपस्थित राहुन शिव व्याख्यान व शिवचरित्र पोवाडा या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा.
Home ताज्या-घडामोडी जेऊर येथे आज प्रा.नितीन बानगुडे-पाटील यांचे व्याख्यान आणि शिवशाहीर सम्राट डाॅ देवानंद माळी...