संतोष तावरे :इंदापूर तालुका प्रतिनिधी
अभिजीत तांबिले यांच्या माध्यमातून विकासाचा निधीचा तगादा चालूच.
इंदापूर:महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व बारामती लोकसभा मतदार संघाच्या लोकसभा सदस्या सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून तसेच महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री व सोलापूर जिल्हाचे पालक मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली काटी वडापुरी जिल्हा परिषद मतदारसंघासाठी २ कोटी २० लाख निधी काटी वडापरी जिल्हा परिषद मतदार संघाचे जिल्हा परिषद सदस्य अभिजीत भैय्या तांबिले यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे.
३०५४ मधील कामे खालील प्रमाणे
१) शहा रस्ता सुधारणा करणे ६५ लक्ष
२) रेडणी ते चाकाटी रस्ता सुधारणा करणे २५ लक्ष
३) झगडेवाडी ते अभंग वस्ती रस्ता सुधारणा करणे ३० लक्ष
४) हेगडे वस्ती ते वरकुटे खुर्द काठी रस्ता सुधारणा करणे ७५ लक्ष
स्थानिक निधीमधून उपलब्ध झालेले कामे खालील प्रमाणे
१) कांदलगाव आई जिजाऊ अस्मिता भवन ७ लक्ष
२) रेडणी तरंगे वस्ती लक्ष्मी आई मंदिर सभामंडप करणे ५ लक्ष
३) गलांडवाडी न – २ भवानी आई मंदिर सभामंडप करणे ३ लक्ष
४) गलांडवाडी नं-२ महादेव मंदिर सभामंडप करणे ५ लक्ष
५) हिंगणगाव आसबे वस्ती हनुमान मंदिर सभामंडप ५ लक्ष
या सर्व ठिकाणच्या होणाऱ्या विकास कामांमुळे काटी वडापुरी गटातील नागरिक अभिजीत भैया तांबिले यांच्या कामावर समाधानी असल्याचे चित्र निर्माण झालेले आहे.