जि.प.शाळा शिलटे येथील अशोक किणी यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न..

प्रतिनिधी: वैभव पाटील
पालघर तालुक्यातील सफाळे पश्चिमेला असलेल्या जि.प. शाळा शिलटे येथे ग्रामस्थांच्या वतीने कार्य कुशल प्रमुख शिक्षक अशोक किणी सर यांचा मंगळवार दी. ३१ जानेवारी रोजी सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न झाला.
त्यावेळी प्रमुख अतिथी माजी गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ म्हात्रे म्हणाले की किणी गुरुजींच्या कार्याची पावती म्हणजे आज लहान बालकापासून ते गावातील ज्येष्ठ मंडळींनी गुरुजींच्या चरणावर अश्रू फुले समर्पित केली. विद्यार्थी आणि ग्रामस्थांना अनावर झालेले अश्रू हाच आपला सर्वोच्च पुरस्कार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच अलका भोईर यांनी भूषविले. त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार गंगाधर म्हात्रे,ग्रा.पं.मांडे सरपंच महेंद्र पाटील, सत्कार मूर्तीचे कुटुंबीय, आप्तेष्ट, मित्रवर्य, शिक्षक , माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी मनोगत व्यक्त केले .
शाळेतील बालकांनी सुमधुर शुभेच्छा गीतांनी व नृत्याविष्काराद्वारे मान्यवरांचे स्वागत केले.तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र लहांगे यांनी केले. प्रसंगी उपसरपंच नलिनी गिराणे, शाळा व्य.स. शिलटेच्या अध्यक्ष पुनम वर्गणे, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष हेमाडे , ग्रामसेवक शिवाजी धनासुरे, ग्रामपंचायत शिलटेचे सर्व ग्रा.पं. सदस्य तसेच तमाम ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम समाप्तीनंतर गावातील तरुण, महिला भगिनी व ग्रामस्थांनी संपूर्ण शिलटे गावातून सत्कारमूर्तीची मिरवणूक काढत सरांना साश्रू नयनांनी निरोप दिला.
सोमवार दि.३० रोजी माकणे व टेंभिखोडावे या केंद्रातील केंद्रप्रमुख व सर्व शिक्षकांनी शिक्षण परिषदेनंतर सरांचा यथोचित सेवापूर्ती सत्कार समारंभ आयोजित केला होता. या दिवशी माकणे व टेंभिखोडावे केंद्राच्या केंद्रप्रमुख दीपिका नाईक यांनी किणी सरांनी प्रामाणिकपणे,निस्वार्थपणे केलेल्या उत्कृष्ट सेवाभावी सरांनीकेलेलयाकारयाचे०क़ कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. केंद्रातील शिक्षकांनाही किणी सरांविषयी बोलतांना अश्रू अनावर झाले.


🛕 ब्रेकींग: पंढरपूरात 137 भाविकांना भगर आणि आमटीतून विषबाधा ! वाचा पुढील लिंक वर क्लिक करून 👉 https://janataexpressmarathinews.com/🛕-ब्रेकींग-पंढरपूरात-137-भाव/
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here