भांडगाव शाळेत दहीहंडी उत्साहात साजरी
जि.प.प्रा.शाळा भांडगाव या शाळेत दहीहंडी उत्सवाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानदेव बागल यांनी केले होते.गोपाळकाल्याचे औचित्य साधून शाळेतील सर्व विद्यार्थी यांनी वेगवेगळ्या रंगभूषा करून शाळेमध्ये आले होते शाळेमध्ये श्रीकृष्ण जन्माविषयी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रामचंद्र शिंदे यांनी केले प्रास्ताविकामध्ये त्यांनी नात्यांमधील प्रेम जिव्हाळा याविषयी माहिती दिलीकार्यक्रमाचे आभार श्री अरविंद शिंदे यांनी मानले.कार्यक्रमाचे नियोजन श्री राहुल जगताप यांनी केले