कोंढार चिंचोली (प्रतिनिधी: आम्रपाली शिंदे) ) खा. सुप्रियाताई सुळे यांच्या कडून सायन्स वॉलची पाहणी: खा.सुप्रिया सुळे यांनी कोंढार चिंचोली तालुका करमाळा येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन सायन्स वॉलची पाहणी केली आहे. दि. 23 रोजी सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान येऊन शाळेला भेट दिली.याप्रसंगी गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या संकल्पनेतून करमाळा तालुक्यातील 227 शाळेत लोकवर्गणीतून सायन्स वॉल तयार करण्यात आले आहेत. त्यापैकीच एक असलेल्या कोंढार चिंचोली जिल्हा परिषद शाळेत खा. सुप्रिया सुळे यांनी भेट दिली .याप्रसंगी बोलताना खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, राष्ट्रीय बातमीपत्रात करमाळा ची बातमी वाचली. त्यामुळेच सायन्स वॉल पाहण्याची उत्सुकता लागली. त्यामुळे खास वेळ काढून यावे लागल्याचे त्यांनी सांगितले . कोंढार चिंचोली शाळेतील सायन्स वॉलवर “पृथ्वी मिसाइल” ची प्रतिकृती काढणारी शाळा पहिलीच आहे, असे त्या म्हणाल्या. संसदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सायन्स वॉल बद्दल संसदेत माहिती मांडणार असल्याचा उल्लेखही खा. सुप्रियाताई सुळे यांनी केला. यावेळी गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी उपक्रमाची माहिती दिली. पुढे बोलताना खा. सुप्रियाताई सुळे सुळे यांनी त्यांच्या मतदारसंघात देखील सायन्स वॉल हा उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले. यावेळी खा. सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते क्रिकेट नेटचे उद्घाटन तसेच जिल्हा परिषद शाळा कोंढार चिंचोली येथील शिक्षिका अनिता बारवकर व शोभा निकम यांचा सत्कार खा. सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी पंचायत समिती सभापती श्री. अतुल भाऊ पाटील ,जिल्हा परिषद सदस्य मंदाकिनी लकडे, बारामती ॲग्रो चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, सरपंच निलिमाताई गलांडे ,उपसरपंच संजय साळुंखे, सोसायटीचे चेअरमन अनिल गलांडे, सर्व शिक्षक व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.