करमाळा( प्रतिनिधी:देवा कदम)तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोगाव (प) या शाळेत २८ फेब्रुवारी अर्थात राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून वृक्ष दिंडीचे आयोजन करून राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या शाळेत प्रत्येक उपक्रम अनोख्या पध्दतीने आणि दर्जेदार पद्धतीने राबविण्यात येतात .याही वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. रविंद्रकुमार पवळ यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमासाठी सोगाव गावचे विद्यमान सरपंच पुष्पलताताई गोडगे,श्री स्वप्निल गोडगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री उत्रेश्वर भोसले, उपाध्यक्ष श्री ब्रम्हदेव सरडे,गावातील सर्व आजी-माजी पदाधिकारी ,ग्रामसेवक श्री. नेमचंद भुजबळ , आरोग्याधिकारी उपस्थित होते.
यावेळी सर्व विद्यार्थी पारंपारिक वेशभूषा करुन आले होते. आकर्षक पालखी, रोपे, तुळस, वाद्य, यासह वृक्षदिंडी काढली होती. तसेच वृक्षारोपण करण्यात आले. सर्वांना वसुंधरेची शपथ देण्यात आली. सदर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी श्री. पठाडे सर, श्री. जगदाळे सर, श्री. गोडगे सर, श्री. काळे सर, श्री मोरेसर,व सर्व अंगणवाडी ताईंनी परिश्रम घेतले.तसेच गटशिक्षणाधिकारी श्री. राजकुमार पाटील साहेब,विस्ताराधिकारी श्री. बदे साहेब,केंद्रप्रमुख श्री. काळे साहेब यांनी सर्वांचे अभिनंदन केले….