पुणे (इंदापूर):- सराटी येथील जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित स्नेह स्वरानंद २०२४-२५ मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे.हे वार्षिक स्नेहसंमेलन दोन (२९ व ३० जानेवारी) दिवस चालणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी यशराज जगदाळे, प्रदिप दोशी,रमेशभाई पटेल, शिरीषकुमार गुजर,सुशिल पताळे, मच्छिंद्र वीर, सविता व्होरा,अपर्णा गांधी, विजया गांधी,नेहा फडे, दिलीप देशमुख आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सुरवात गणेशाच्या नृत्याने झाली. इंग्रजी-मराठी एकांकिका, गीतगायन, पारंपारिक नृत्य, कोळीगीते, देशभक्तिपर गीते विद्यार्थ्यांनी सादर केली.‘‘वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण असतो. या माध्यमातून त्यांच्या कलागुणांचा गौरव शिक्षण संस्थेकडून केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला व कौशल्याला वाव मिळतो. नेतृत्व गुण केवळ राजकीय क्षेत्रातच उपयोगी पडतात असे नाही, तर व्यावसायिक, शैक्षणिक क्षेत्रांतही त्यांचा चांगला उपयोग होतो,’’असे संस्थेचे संस्थापक आप्पासाहेब जगदाळे यांनी या वेळी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आप्पासाहेब जगदाळे यांनी केले आहे.यावेळी विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधत होते तर जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळातील सर्व शिक्षक कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता प्रयत्न असल्याचे दिसत होते.
Home Uncategorized जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलनास दिमाखात सुरूवात..विद्युत रोषणाई ठरतेय कार्यक्रमाचे प्रमुख...