जेऊर प्रतिनिधी (हनुमंत निमगिरे):जिजाऊ ब्रिगेड जेऊर ता.करमाळा तर्फ राष्ट्रमाता जिजाऊ,सावित्राबाऊ फुले व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी.कार्यक्रमाची सूरूवात वीरपत्नी राणिताई काटे यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद यांच्या फोटोला पुष्पहार घालुन करण्यात आली.
कु.सिद्धी वळेकर या विद्यार्थिनीने आपल्या मनोगतातुन राष्ट्रमाता जिजाऊ यांनी केलेला संघर्ष व त्यातुन निर्माण झालेल्या स्वराज्याच्या संकल्पना तसेच सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाबाबत केलेले कार्य व यासाठी सोसलेला त्याग व त्रास या गोष्टी मांडल़्या.त्यांच्या या त्यागामुळे आज महिला कोणत्याही क्षेत्रात अव्वल आहेत.असे सांगितले.जिजाऊ ब्रिगेड पल्लवी शिंदे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले याचे विचार व संस्कार प्रत्येकाने अंगी बाळगावेत व जिवन सुंदर प्रकारे फुलवुन त्यांच्या विचारांची जयंती अशीच साजरी करावी असे आवाहन त्यांनी केले.तसेच बहुजन महापुरुषांच्या 100 पुस्तकांचे घरोघरी वाटप करण्यात आले.
Home Uncategorized जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जेऊर येथे सावित्रीबाई फुले जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची...