इंदापूर: शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना विरोधात बंडखोरी करत तब्बल 40 आमदार फोडले व महाविकास आघाडी सरकार कोसळले.शिवसेना विरुद्ध बंड केल्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. व त्यानंतर एक एक करत चाळीस शिवसेनेचे आमदार फुटून शिवसेनेला चांगलीच गळती लागली होती.परंतु उद्धव साहेबांचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिक आपल्या परीने प्रयत्नाची पराकाष्टा करताना पाहायला मिळत आहे.
आणि उद्धव साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या व कठीण काळात शिवसैनिकांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दसरा मेळाव्याला सामील होण्यासाठी धाराशिव मधून दोन कडवे शिवसैनिक चक्क पायी चालत धाराशिव ते मुंबई हे अंतर पार करणार आहेत.बंडू आदरकर हे उपशहर प्रमुख धाराशिवचे असून भीमा जाधव हे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत हे दोघेही गेले पाच दिवस अखंडित चालत धाराशिव मधून इंदापूर पर्यंत आले होते आणि यांचे स्वागत इंदापूर मधील सर्व शिवसैनिकांनी अगदी जल्लोषात केले. नुसते स्वागत न करता रात्री त्यांची राहण्याची व खाण्याची सुद्धा सोय येथील शिवसैनिकांनी करून आपुलकीचे दर्शन घडवत शिवसेना हा पक्ष नसून कुटुंब आहे याची जाणीव करून दिली.
बंडू आदरकर यांचे धाराशिवमध्ये सायकल दुकान असून भीमा जाधव हे शेती करतात गेल्याने अनेक वर्ष या दोघांना शिवसेनेची आवड होती. एकनाथ शिंदे यांनी केलेला बंड त्यांना आवडला नव्हता. शिवसेनेला पुन्हा चांगले दिवस येऊन उद्धव साहेब मुख्यमंत्री व्हावेत अशी त्यांची इच्छा आहे आणि म्हणूनच धाराशिव मधून निघाल्यापासून प्रत्येक गावात पोहोचल्यानंतर तेथील शिवसैनिकांना ते भेटून प्रोत्साहन देत खंबीरपणे उद्धव साहेबांच्या मागे उभा रहावे असे आवाहनही ते करत आहेत.
एकूणच संपूर्ण महाराष्ट्रात पाहिला गेले तर चाळीस आमदार जरी फुटले असतील तरी शिवसैनिक जाग्यावरच असून त्याचे अद्यापही प्रेम शिवसेना व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत असल्याचे याच उदाहरणावरून पाहायला मिळते.
इंदापूर मध्ये पोहोचल्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी शिवसेनेचे पुणे जिल्हा समन्वय विशाल दादा बोंद्रे, इंदापूर शहर चे तडफदार नेतृत्व शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी, संजय खंडागळे, अंकुश गलांडे, अशोक देवकर, दादा देवकर, देवा मगर, विकास खिलारे,बंडू शेवाळे, त्याचबरोबर इतरही बरेच शिवसैनिक यावेळी हजर होते.