जागृती सेवा प्रतिष्ठान हे गेल्या अनेक वर्षांपासून इंदापूर मध्ये कार्यरत आहे. जागृती सेवा प्रतिष्ठानचा गणपती हा इंदापूर मधील एक मानाचा गणपती समजला जातो. गणेशोत्सवातच नव्हे तर वर्षभरात वेगवेगळ्या सण- वाराचे औचित्य साधून अनेक समाजोपयोगी कार्यक्रम या मंडळाद्वारे करण्यात येते. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता त्याच्यामुळे गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने करण्यात आला होता पण यावर्षी अगदी हर्ष-उल्हासमध्ये जागृती प्रतिष्ठानच्या वतीने गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे.
भारत देश हा स्वतंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत आहे आणि यावर्षी याचे औचित्य साधून जागृती सेवा प्रतिष्ठानच्या वतीने गणरायाची आरती ही माजी सैनिक यांच्या हस्ते करून या सैनिकांना सन्मानित करण्याचा अभिनव उपक्रम जागृती सेवा प्रतिष्ठानने केला. याच सैनिकांमुळे आपल्या देशातील प्रत्येक नागरिक हा सुरक्षित आहे सैनिक हा आपल्या जीवाची बाजी लावून सीमेवर लढत असतो त्यामुळे आपलेही कर्तव्य त्यांना सन्मानित करण्याचे आहे याच भावनेतून आजी-माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.यापुढेही वर्षभरात जागृती सेवा प्रतिष्ठानच्या वतीने गोरगरिबांसाठी शिबिरे, जनजागृतीसाठी व्याख्याने त्याचबरोबर महिला व लहान मुलांकरिता करमणुकीचे कार्यक्रम आयोजन करणार असल्याचे मंडळाच्या सदस्यांकडून सांगण्यात आले.जागृती सेवा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या सैनिकांच्या सन्मानात जय हिंद माजी सैनिक संघटनेचे मेजर मारुती मारकड, मेजर रविराज पवार मेजर महादेव सोमवंशी, सुभेदार कुंभार, मेजर रणवरे,मेजर शिंदे, मेजर डोंगरे यांच्या हस्ते मंडळाच्या गणेशाची आरती करून या भारत मातेची सेवा करणाऱ्या सुपुत्रांना शाल,फेटा,पुष्पहार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांतदादा सिताप,मंडळाचे अध्यक्ष शुभम गांधी, चिन्मय देशपांडे,सुनील इंगोले, स्वप्नील इंगोले, रुपेश सोनी, विशाल ढोले, अतुल दळवी, विनायक नागपुरे, विक्की इंगोले व इतर सदस्य उपस्थित होते.