निमगाव केतकी:दि ९ इंटरनेट, सामाज माध्यमं यांच्या आधुनिक काळातही भारतीय टपाल विभागाने बदलत्या काळानुसार बदलत स्वतःचे अस्तित्व अधोरेखित केले आहे. कोणत्याही परिस्थितीत, ऋतूत अखंड सेवा देणाऱ्या आणि निष्ठेने आपले कर्तव्य बजावणाऱ्या टपाल विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना जागतिक टपाल दिनाचे औचित्य शिक्षक समिती इंदापूर शाखेच्या वतीने निमगाव केतकी येथील पोस्ट कार्यालयात अविरतपणे विनम्र , विश्वसनीय , तत्पर सेवा देणारे पोस्ट अधिकारी श्रीकांत लोखंडे , वरकुटे खु पोस्टमन नवनाथ मिसाळ , काटीचे दिपक सावंत , व्याहाळीचे विठ्ठल गुरव , निमगाव केतकीचे ओंकार डोईफोडे , गोतोंडीचे सचिन देवकर यांना मास्क , गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला.
प्रसंगी शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष भारत ननवरे यांनी पोस्टमनच्या तत्परतेमुळे मी शिक्षक पदी नोकरीस लागलो असे सांगितले. कोविड १९ काळातही अविरतपणे सेवा सुरु ठेवून सर्वसामान्य चांगली सेवा दिल्यामुळे सर्वाचे कौतुक करण्यात आले.
प्रसंगी पुणे जिल्हा सोसा. माजी चेअरमन तथा संचालक अरूण मिरगणे , शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष भारत ननवरे , सुरेश धारूरकर , अतुल जौंजाळ , अजिनाथ आदलिंग , जुनी पेन्शन तालुका अध्यक्ष संतोष हेगडे उपस्थित होते.पोस्टमन नवनाथ मिसाळ यांनी आभार मानले.