प्रतिनिधी:महेश सूर्यवंशी
लिंगळी, ता.दौंड. ग्रामपंचायत हद्दीत (दि.9जुलै) मेरगळवाडी येथे विविध विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पडला. जिल्हा परिषद सदस्य विरधवल जगदाळे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीतील जी. प.अंतर्गत २ कोटी ४८ लक्ष रुपयांच्या विविध कामे पुर्ण झाली आहेत. कामांचा लोकार्पण सोहळा बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी माजी आमदार रमेश आप्पा थोरात, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री विकास कदम, जितेंद्र बडेकर,लिंगाळी चे सरपंच श्री सुनिल जगदाळे, उपसरपंच सौ वैजंता चीतारे, सुहास जगदाळे,ग्रामपंचायत सदस्य अरुण गावडे,संतोष गावडे,सीमा मेरगळ, संगीता रणशृंगारे, सौ सविता निमुणकर, संदीप येडे, नितीन चितारे, लालासाहेब जगदाळे अरुण साबळे , संजय गावडे आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.