इंदापुर शहरातील वीरश्री छत्रपती मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे संवर्धन व हजरत चांदशावली दर्गा संवर्धन व सुशोभीकरणासंर्दभातील आराखडे वित्त व नियोजन विभागाकडे सादर करण्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे माजी राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सह्याद्री शासकीय अतिथी गृहातील बैठकीप्रसंगी जिल्हाधिकारी यांना आदेश दिले.वीरश्री छत्रपती मालोजीराजे भोसले यांच्या गढी संवर्धन व चांदशावली दर्गा संवर्धन व सुशोभीकरण संदर्भात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या उपस्थितीत मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृह बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी मुख्य सचिव वित्त विभाग अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग डॉक्टर नितीन करीर ,नगर विकास विभाग प्रधान सचिव डॉ गोविंदराज साहेब प्रधान, सचिव पर्यटन श्रीमती राधिका रस्तोगी मॅडम, व्हीसीद्वारे जिल्हाधिकारी पुणे डॉक्टर राजेश देशमुख ,जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंता पुणे आराखड्याची सादरीकरण करण्यात आले या आराखड्याबाबत आदरणीय श्री अजितदादा यांनी मालोजीराजे भोसले यांच्या गडीचे व हजरत चांदशावली बाबांच्या दर्गाच्या परिसर जागेची माहिती व सद्यस्थिती व काय आहे व काय करण्यात येईल हेरिटेज दर्जा पद्धतीने सुशोभीकरण करण्याच्या सूचना केल्या तसेच जुन्या काळातील इतिहास नव्या पिढीला कळावा याबाबतची याबाबत पुरातत्त्व विभागाकडून माहिती इतिहासाची माहिती घेऊन त्याचा बाबत अहवाल जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण आराखडा तयार करून शासनाकडे सादर करण्याच्या सूचना करून आवश्यक निधीची उपलब्धता करण्यात येईल असे आदेश देण्यात आले. जिल्हाधिकारी पुणे यांनी आराखडा तयार करून वित्त व नियोजन विभागाकडे सादर करावा याबाबतच्या सूचनाही उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांनी माजी राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार श्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीप्रसंगी केल्या.यावेळी इंदापुर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री बाळासाहेब ढवळे, शिवप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते श्री भारत जामदार,आझाद पठाण, ओंकार साळुंके हे बैठकीप्रसंगी उपस्थित होते.
Home Uncategorized छत्रपती मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे संवर्धन व हजरत चांदशावली दर्गा संवर्धन व...