इंदापूर:मंगळवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी इंदापूर अर्बन बँकेमध्ये आयोजित केलेल्या शेतकरी आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीमध्ये बोलताना राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी शेतकऱ्यांचे चालू एक बिल भरून विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याचे धोरण ठरले असल्याचे नमूद केले.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शेतकऱ्यांचा वीज पुरवठा शेतकऱ्यांनी एक चालू बिल भरून पूर्वत करावा असे आवाहन केले होते या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तालुक्यातील शेतकरी व वीज वितरण कंपन्यांच्या अधिकाऱ्या समवेत इंदापूर अर्बन बँक येथे बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शेतकऱ्यांनी चालू एक बील भरून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासंदर्भातील धोरण ठरल्याचे सांगितले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय घेत असून हे डबल इंजिनचे जनतेचे सरकार असून या सरकारमध्ये शेतकऱ्यांसाठी योग्य धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत.या धोरणात्मक निर्णयाचा एक भाग म्हणून सौर ऊर्जा संदर्भात घेतलेल्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. महाराष्ट्रामध्ये दहा हजार मेगावॅट पर्यंत सौर ऊर्जा निर्माण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून इंदापूर तालुक्यातील 300 एकर जमिनीवरती सौरऊर्जा प्रकल्प निर्माण करण्याचे काम देखील विद्युत मंडळाने हाती घेतले असून ज्या मोठ्या उपसा सिंचन योजना आहेत त्या सर्व योजना सौरऊर्जावर झाल्या पाहिजेत यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले की तालुक्याचे लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये असमर्थ ठरत असून ते या प्रश्नाकडे सतत दुर्लक्ष करीत आहेत.
यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपले शेती वीजपुरवठा संदर्भात मनोगत व्यक्त केले.यावेळी महावितरणचे बारामती कार्यकारी अभियंता गणेश लटपटे , इंदापूर प्रभारी उपअभियंता प्रमोद जाधव ,एम. व्ही .सूळ ,विशाल गावडे हे अधिकारी यावेळी उपस्थित होते.