ता, 22 नातेपुते – दरवर्षी प्रमाणे चंद्रप्रभू इंग्लिश मेडीयम स्कूल, नातेपुते याठिकाणी मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी नातेपुते नगर पंचायतच्या नगराध्यक्षा सौ. उत्कर्षाराणी पलंगे , नगरसेविका सौ. संगीता काळे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी चंद्रप्रभू स्कूल सामाजिक उपक्रमात ही आग्रेसर असल्याचे सौ, पलंगे म्हणाल्या. यावेळी नातेपुते शहरातील महिला डॉक्टर, शिक्षीका, आधिकरी सह मातापालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी सौ. अर्चना गांधी, सौ. वर्षा दवाडा, सौ. रेवती दोशी, सौ.सारिका गांधी शाळेच्या मुख्यध्यापिका सौ. शितल ढोपे मॅडम, पर्यवेक्षिका सौ. मुजावर ,प्री-प्रायमरी सुपरवायझर सौ.पल्लवी कुलकर्णी सह सर्व महिला शिक्षीका उपस्थित होत्या. यावेळी आगळे वेगळे मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. चिठीत लिहलेल्या नावावरून गाणी म्हणणे, उखाणे घेणे, संगीत खुर्ची यासारखे खेळ घेण्यात आले. यावेळी महिलांना वाण देण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सुंदर अयोजन नियोजन केले होते त्यामुळे उपस्थित महिलांनी शाळेचे कौतुक केले. अशी माहिती शाळेचे शिक्षक श्री. संजय वलेकर सर यांनी दिली.