चंद्रकांत पाटील व राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केलेल्या वक्तव्यांच्या निषेधार्थ कुर्डूवाडीत आरपीआय निदर्शन करणार.

डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या, शाळा सुरू करताना त्यांना सरकारने अनुदान दिलं नाही ,तर त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालवतोय पैसे द्या, तेव्हाच्या काळात दहा रुपये देणारी लोक होती. आत्ता दहा / दहा कोटी रुपये देणारी लोक आहेत .असे अपमानास्पद वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल भगतसिंग कोशारी यांनी अपमानास्पद वक्तव्य केले होते त्यामुळे या दोघांचाही निषेध करण्यासाठी दिनांक १४|१२|२०२२ रोजी ठीक दहा वाजता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ कुर्डूवाडी मध्ये निदर्शन करण्यात येणार आहे अशी माहिती जनता एक्सप्रेस मराठी न्यूजशी बोलताना आरपीआय माढा तालुका अध्यक्ष आकाश जगताप यांनी दिली . पुढे ते म्हणाले की  कुर्डूवाडी येथील सर्व नागरिकांना  मी आवाहन करतो की, या दोघांचा निषेध करण्यासाठी आपण सगळे एकत्र येण्याची विनंती मी करीत आहे अशी ही आकाश जगताप यांनी बोलताना सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here