विश्रामपूर :स्व. कपिल चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चित्रकला व भेटवस्तू दान समारंभ शुक्रवार दि. 23 डिसेंबर 2022 रोजी जि. प. शाळा विश्रामपूर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे चित्रकला स्पर्धा घेण्यात आली सदर चित्रकला स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आली प्रथम व द्वितीय पारितोषिक मिळालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तर उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आहे. तसेच कपिल पाटील यांच्या स्मरणार्थ जि. प .शाळा विश्रामपूर शाळेला एक पुस्तकांसाठी कपाट भेट देण्यात आहे.यावेळी कविवर्य तुषार ठाकरे यांनी प्रास्ताविक सादर करत असताना कपिल पाटील चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला .या ट्रस्टचे अध्यक्ष तथा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक वैभव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कपिल पाटील च्या अनेक आठवणींना उजाळा दिला व चित्रकला स्पर्धा आणि पुस्तक वाटप करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. ग्रामीण भागामधून उत्तम चित्रकार व , साहित्यिक घडावेत व कपिल पाटील यांच्यासारखे सामाजिक कार्य पुढील पिढीकडून घडत राहावे असे प्रतिपादन केले. तर उपसरपंच भूपेंद्र नाईक यांनी यापुढे ट्रस्टला पाहिजे ती मदत करण्याची तयारी दर्शवली या वेळी समाजिक कार्यकर्ते जितेंद्र पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला .सदर प्रसंगी कपिल पाटील यांचे आई-वडील, चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य मेघा पाटील, छाया पाटील, परेश पाटील, तन्वी ठाकरे, वसरे- विश्रामपूर ग्रामपंचायत च्या सरपंच श्रुती कडू, उपसरपंच भूपेंद्र नाईक, शालेय समिती सदस्य ,ग्रामपंचायत सदस्य,सामाजिक कार्यकर्ते हरेश्वर पाटील, उमेश पाटील , रणजीत पाटील , ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद सोगले सर यांनी केले तर आभार सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पाटील यांनी मानले.