इंदापूर: गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महालक्ष्मी ग्रामीण निधी या पतसंस्थेचे उद्घाटन केले. इंदापूर तालुक्यातील काही सुशिक्षित नवयुवकांनी चालू केलेल्या या पतसंस्थेस शुभेच्छा देताना माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की,”युवकांनी एकत्र येऊन उभा केलेल्या या पतसंस्थेने ग्रामीण भागातील सामान्य लोकांच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील राहावे, वेगवेगळ्या कर्ज योजना अंतर्गत शेतकरी व सामान्य लोकांना पतपुरवठा करावा व सामान्य लोकांनीही आपल्या भागातील नवयुवकांनी उभारलेल्या या पतसंस्थेस योग्यरित्या कर्ज परतफेड करून सहकार्य करावे असे मत माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उद्घाटन प्रसंगी केले.इंदापूर तालुक्यातील बापू गार्डे, बाळकृष्ण बागल, सुनील हगारे, सागर आवटे, रायबा नरबट, योगेश म्हेत्रे, विपुल भोंग या सर्व उच्चशिक्षित युवकांनी एकत्र येऊन महालक्ष्मी ग्रामीण निधी या पतसंस्थेची स्थापना केली असून यामध्ये सोनेतारण कर्ज दुग्ध व्यवसायासाठी कर्ज,व्यावसायिक कर्ज,शेती तारण कर्ज इत्यादी प्रकारची कर्ज योजना ची सोय केली आहे. यावेळी संस्थेचे संचालक बापू गार्डे व सुनील हगारे यांनी संस्थेचा पारदर्शक कारभार चालवत संस्थेची प्रगती व विस्तार करणार असल्याची ग्वाही दिली.
त्याचप्रमाणे या संस्थेमार्फत आरटीजीएस सुविधा मोफत केली असून आकर्षक मुदत ठेव योजना, रिकरिंग डिपॉझिट ठेव योजना,मासिक व्याजप्राप्ती योजना अशा आकर्षक ठेवी योजना सुद्धा चालू केलेल्या असून पहिल्या दिवसापासून या संस्थेत चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अशी ही माहिती संचालक मंडळांनी दिली. पतसंस्थेच्या उद्घाटन समारंभास आमदार दत्तात्रय भरणे एनसीपीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा गारटकर, माजी नगराध्यक्ष अंकिता शहा, कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शेठ शहा, मुकुंद शेठ शहा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Home Uncategorized ग्रामीण भागातील सामान्य लोकांच्या उन्नतीसाठी महालक्ष्मी ग्रामीण निधी लि.या पतसंस्थेने काम करावे-...