ता.प्रतिनिधी. सचिन शिंदे.जनता एक्स्प्रेस मराठी न्युज.
चिंचोली मोराची:चिंचोली मोराची हे कृषी स्थळ असून या ठिकाणी वर्षभर पर्यटकांची व नागरिकांची पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातून तसेच शेजारील परिसरातुन मोठ्या प्रमाणात येजा असते.या परिसरातील विद्यार्थ्याचे पुणे शहरात शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात येजा करावी लागत बस सेवा नसल्यामुळे खुप गैरसोय होती.मनपा ते शिक्रापूर अशी बससेवा प्रत्येक अर्ध्या तासाला सुरू आहे.मात्र पुणे तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांना तसेच पर्यटकाना चिंचोली मोराची येथील पर्यटन केंद्र पाहावयास जाण्यासाठी शिक्रापूर पुढे एकही बस सुविधा नसल्याने पर्यटकांची तसेच विद्यार्थ्याचे,शेतकरीवर्गाची जाण्यासाठी गैरसोय होत असल्याचे चिंचोली मोराची येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले.
शिरूर तालुक्यातील न्हावरे रांजणगाव गणपती अशा ठिकाणी ही बस सेवा सुरू झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या चिंचोली मोराची पुणे पीएमपीएमपी बस सेवेसाठी या भागातून मागणी वाढली आहे.बस सुविधा नसल्यामुळे पर्यटकांची,विद्यार्थ्याची तसेच शेतकरी वर्गाची येथून पुढे पुण्याकडे जाण्यासाठी गैरसोय होती.
कान्हुर मेसाई,चिंचोली मोराची,मिडगुलवाडी,वरूड ,गणेगाव,शास्ताबाद,वाघाळे या परिसरात मोठा कामगारवर्ग असल्याने त्यांनाही कामावर बस अभावी जाण्यासाठी मोठा आटापिटा करावयास लागत आहे.तसेच या परिसरातील नागरिकसाठी जवळची बाजारपेठ शिक्रापूर, वाघोली, पुणे या ठिकाणी असुन परिसरातील शेतकऱ्यांना जाण्यासाठी मनपा बससेवा सुरू झाल्यास या परिसरातील नागरिकांचा तसेच विद्यार्थ्याचा जाण्या येण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, अशी मागणी सरपंच अशोकराव गोरडे, ग्रामपंचायत उपसरपंच राहुल नाणेकर,माजी सरपंच महेश गोरडे ,माजी उपसरपंच मच्छिंद्र धुमाळ,गोविंद नाणेकर, विलास गोरडे,दत्तात्रय करंजकर,सुरेश नाणेकर, माऊली नाणेकर आदी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी माजी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे केली आहे.परिवहन महामडंळाचे अध्यक्ष लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी पञाची दखल घेऊन चिंचोली मोराची ते पुणे बस सेवा लवकरात लवकर सुरू करण्यात येईल असे सांगितले.
असे सांगण्यात आल्यावर पुढाकार घेत श्री.विलास शंकर धुमाळ कायम चालक क्र 2715 न.ता.वाडी डेपो शिवाजी नगर पुणे गेली 12 वर्षापासून पी.एम.पी.एम.एल मध्ये काम करत असुन यांनी मा. दत्तात्रय झेंडे साहेब वाहतूक व्यवस्थापक पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.यांची समक्ष भेट घेतली व त्यांनी ही होकार दिला. लवकरात लवकर बससेवा चालू करु असे आश्वासन ही त्यांनी दिले आहे.
Home ताज्या-घडामोडी ग्रामपंचायत चिंचोली मोराची ते पुणे बसची महत्वाची मागणी .पर्यटक,कामगार, विद्यार्थ्याची गैरसोय