गौतोंडी गावचे ज्येष्ठ समाजसुधारक अर्जुन (बापू )बनसोडे यांचे निधन.

इंदापूर:कचरवाडी गावचे सलग चार वर्षे सरपंच पद भूषवलेले त्याचप्रमाणे आपल्या कचरवाडी गावात सर्वसामान्य लोकांची दवाखाना अभावी होणारी गैरसोय लक्षात घेता स्वतःच्या मालकीची जागा सरकारी हॉस्पिटल बांधण्यासाठी देणारे अर्जुन (बापू) बनसोडे यांचे रविवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले.अर्जुन (बापू) यांचे सामाजिक शैक्षणिक राजकीय या क्षेत्रात मोलाचे योगदान आहे त्यांना आदराने पंचक्रोशी मध्ये लोक “बापू” या नावाने ओळखत असे. त्यांनी गौतमेश्वर प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले होते.बापूंनी समाजासाठी आपले जीवन एक प्रकारे समर्पित केले होते.इंदापूरचे आमदार दत्तामामा भरणे यांचे वडील विठोबा तात्या यांचे ते जवळचे मित्र होते.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here