“गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी यापुढे अधिक वेगाने गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचा मानस”- हनुमंत (नाना) बनसुडे.

एल.जी बनसुडे विद्यालयाचा 11 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा .
पळसदेव (ता.इंदापूर) येथील एल.जी बनसुडे विद्यालयामध्ये दिनांक 22/6/2023 रोजी संस्थेचा 11 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री हनुमंत (नाना) बनसुडे , कार्याध्यक्षा सौ.नंदाताई बनसुडे, प्राचार्या वंदना बनसुडे, सचिव नितीन बनसुडे संस्थेच्या विश्वस्त सौ.अर्चना ताई बनसुडे, सौ.अनुराधा कणके ,अंकुश बनसुडे तसेच बाबा (आप्पा) बनसुडे, सौ.नमिता बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे ,पत्रकार सचिन लोंढे, विद्यार्थी पालक,सर्व विभाग प्रमुख, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.प्राचार्या सौ वंदना बनसुडे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.अध्यक्षस्थान भूषवत असताना अंतिम भाषणात नाना म्हणाले की,”संस्थेने मागील 11 वर्षाचा प्रवास ज्या वेगाने केला त्यापेक्षाही अधिक वेगाने गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचा मानस आहे.ही संस्था सर्वांना समजावून घेत,सर्वांच्या समस्या लक्षात घेत , व गोरगरीब मुलांना सांभाळून घेत चालवली जात आहे.त्यामुळे संस्थेत दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या वाढत चालली आहे.” या कार्यक्रमात नुकत्याच पार पडलेल्या 10 वी व 12 वी बोर्ड परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या तसेच राज्यस्तरावर खेळाचे नेतृत्व केलेल्या विध्यार्थ्यांचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री प्रकाश दरदरे सर यांनी केले तर आभार सौ. चैत्राली जगदाळे यांनी मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here