गोरगरिबांची सेवा करण्यात धन्यता मानणारी ‘आई’ गेल्याचे दुःख – हर्षवर्धन पाटील यांनी केले पवार कुटुंबाचे सांत्वन.

इंदापूर: आज दिनांक 12 जानेवारी रोजी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अनिल अण्णा पवार यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. काल अनिल अण्णा पवार यांच्या मातोश्री विमल पवार यांचे निधन झाले होते. आपल्या सांत्वन भेटीदरम्यान हर्षवर्धन पाटील म्हणाले की,”गेल्या अनेक वर्षापासून समाजात तळागाळातील माता-भगिनींची सेवा करणारा व इंदापूर शहरात लोकप्रिय असलेला अनिल अण्णा पवार आता पोरका झाला आहे.अनिल अण्णा पवार यांच्या मातोश्री विमल सुदाम पवार (वय ५५) यांचे काल पहाटे दुःखद निधन झाले. त्यामुळे गोरगरिबांची ‘ आई ‘ हरपली आहे असे हर्षवर्धन पाटील सांत्वन भेटी दरम्यान म्हणाले.
ते पुढे म्हणाले की,”शहरातील कोणत्याही जाती-धर्मातील गरीब व्यक्ती अगदी सहजरीत्या अनिल अण्णांच्या मातोश्री कडे जाऊन आपल्या अडीअडचणी सांगत होत्या आणि त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्नही करत होत्या त्यामुळे त्यांना समाजात सर्वजण आपलेपणाने ‘आई’ असंच म्हणायचे.इंदापूर परिसरामध्ये अनिल अण्णा पवार यांना समाजसेवा करताना प्रोत्साहन देण्यासाठी अनिलच्या मातोश्री विमल पवार ह्या नेहमी अग्रेसर असत.समाजासाठी काम करताना पैसा व वेळ याचे मोजमाप कधीच करायचे नाही ही त्यांची शिकवण अनिल अण्णा यांनी सुरुवातीपासून आत्मसात केली होती. त्यामुळे अगदी अनपेक्षित पणे गोरगरिबांची सेवा करणारी ही ‘आई ‘ गेल्याने मनस्वी दुःख होत आहे.अनिल अण्णा पवार यांच्या कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे” असेही हर्षवर्धन पाटील म्हणाले.
हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत या सांत्वन भेटी दरम्यान शेखर पाटील, सागर गानबोटे ,दादा भिसे, गोरख शिंदे,दत्ताभाऊ पांढरे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here