इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे वतीने निमगाव केतकी येथील सुवर्णयुग गणेश मंदिर येथे सातारा सैनिक स्कूल व जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश मिळाल्याबद्दल गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार शिक्षक समिती पदाधिकारी व मच्छिंद्र चांदणे , तात्यासाहेब वडापुरे, ॲड. दिलीप पाटील,गणेश घाडगे,किरण म्हेत्रे,अरूण मिरगणे,दिलीप अभंग यांचे हस्ते करण्यात आला.यावेळी चि.क्षितीज मंगेश शेंडे याची सातारा सैनिक स्कूल निवड,तसेच जवाहर नवोदय विद्यालय शिक्रापूर येथे कु.स्वराली विकास भोंग ,चि.हर्षराज किरण म्हेत्रे, चि.अनुराग तेजस भोंग , चि.ऋतूराज अमोल शेंडे , चि.मल्हार श्रीकांत करे यांचा फेटा,शाल,शैक्षणिक साहित्य , श्रीफळ , गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मच्छिंद्र चांदणे ,ॲड दिलीप पाटील,.डॉ.तेजस भोंग ,तात्यासाहेब वडापुरे,दिलीप अभंग,किरण म्हेत्रे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.प्रसंगी पुणे जिल्हा शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचे संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल प्रताप शिरसट,नीट परिक्षेत 600 गुण मिळवलेला करण हेगडे व प्रज्वल भारत ननवरे याने दहावीत 92 % गुण मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी पत्रकार मनोहर चांदणे ,गणेश घाडगे,शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष भारत ननवरे,तात्यासाहेब राऊत , अजिनाथ आदलिंग,भारत शेंडे ,राजु भोंग,भुषण जौंजाळ,विकास भोंग,अमोल शेंडे,गणपत खोमणे गुरूजी,राजकुमार तरंगे,भारत बैजु ननवरे,सतेश भोंग,रत्नमाला भोंग,रोहिणी भोंग ,रोहिणी म्हेत्रे उपस्थित होते.सुत्रसंचालन संतोष हेगडे यांनी केले.
Home Uncategorized गुणवत्तेबरोबर संस्कारक्षम पिढी घडवण्याचे पालक व शिक्षक यांचेसमोर आव्हान. – तात्यासाहेब वडापुरे