गावकामगार पोलीस पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असून त्यांच्या न्याय हक्कासाठी कटिबद्ध असल्याचे मत माजी राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांनी आज भरणेवाडी येथे केले.नागपुर येथे होणा-या अधिवेशन काळातील गावकामगार पोलीस पाटील संघाचे मोर्च्याला उपस्थित राहणेबाबत माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांना निमंत्रण देण्यासाठी पोलीस पाटील यांच्या कमिटीने आ.भरणेमामांची आज भेट घेतली होती.महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाच्या कमिटीने माजी राज्यमंत्री आ.दत्तामामा भरणे यांची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या होत्या.त्याचबरोबर या कमिटीने एक निवेदन दिले होते यात पोलीस पाटलांचे प्रलंबित मागण्यांसाठी २२ डिसेंबर रोजी दुपारी ११ते २ या कालावधीमध्ये गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने भव्य मोर्चा आयोजित केलेला आहे.गाव खेडयातील पोलीस पाटलांना समर्थन व मागण्या मान्य करण्यासाठी आपली उपस्थिती अतिशय महत्वाची आहे.तरी आपण उपस्थित राहून पोलीस पाटलांच्या मागण्यांचा गांभिर्याने विचार करण्यास राज्य सरकारला विनंती करावी अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने आज इंदापूर कमिटीतील सदस्यांनी माजी राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांना दिले.यावेळी पोलीस पाटील यांच्या व्यथा शासन दरबारी मांडणार असल्याचे मत माजी राज्यमंत्री दत्तमामा भरणे यांनी केले.
Home Uncategorized गावकामगार पोलीस पाटील यांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभा राहणार...