गल्ली पासून..ते.. मुंबई पर्यंत शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर? अंतर्गत कुरघोडीत सर्वच पातळीवरील शिवसेना नेते अग्रेसर..

पुणे प्रतिनिधी :रवींद्र शिंदे.

पुणे : राज्यात एकेकाळी शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे हे हयात असताना शिवसेना पक्ष एकसंघ पद्धतीने संघटित कार्य करत असल्याचे दिसून येत होते परंतु आता ग्रामपंचायत ते मंत्रिमंडळ इथपर्यंतच्या शिवसेना नेत्यांमध्ये एकमेकांमधील कुरघोडी लपून राहिलेली नाही.मंत्रिमंडळ गेल्या काही दिवसापासून सतत चर्चेत राहिलेले किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या नेत्यांवर गंभीर आरोप करत त्यांचा पोलखोल करण्याचा प्रयत्न चालू आहे काही दिवसात किरीट सोमय्या हे बारामतीला ही येणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे यातच परिवहनमंत्री अनिल परब यांच्या बांधकामाविषयी माहिती काढून ती भाजप नेते किरीट सोमय्या यांना देण्याचे काम माजी मंत्री रामदास कदम यांनीच केले आहे, याचा पुनरुच्चार राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेमध्ये केला.

यावेळी त्यांनी माहिती अधिकार कार्यकर्ता प्रसाद कर्वे आणि किरीट सोमय्या, तसेच प्रसाद कर्वे आणि रामदास कदम यांच्यामध्ये झालेल्या संभाषणाची आडिओ क्लिपही सादर केली. ‘आता त्याची १०० टक्के वाट लागली,मेला तो…’ असे विधान रामदास कदम यांनी मंत्री परब यांच्याबाबत केल्याचे या आडिओ क्लिपमध्ये स्पष्ट ऐकू येत असल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.

माजी आमदार संजय कदम आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत या आडिओ क्लिप सादर केल्या. कर्वेमार्फत रामदास कदम यांनी परब यांच्या रिसार्टविषयी माहिती काढली. ही माहिती किरीट सोमय्या यांना पुरवून सरकार अस्थिर करण्याचा कदम यांचा प्रयत्न आहे, असा आरोप याआधीच या दोन नेत्यांनी केला होता. त्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. या आरोपाचे समर्थन करण्यासाठी त्यांनी कर्वे व रामदास कदम तसेच कर्वे व सोमय्या यांच्या संभाषणाच्या क्लिपही ऐकवल्या.

दापोली तालुक्‍यातील मुरूड समुद्रकिनारी असलेल्या शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर व परिवहनमंत्री अनिल परब यांच्या बांधकामाची तक्रार सोमय्या यांनी केली होती. पदाचा गैरवापर करून सीआरझेड क्षेत्रात अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने मुरूड येथील सर्वच व्यावसायिकांना नोटिसा पाठवल्या आहेत. या साऱ्यामध्ये रामदास कदम हे सोमय्या यांना मदत करत आहेत असा आरोप केला जातोय. शिवसेनेतील स्थान डळमळीत केले म्हणूनच रामदास कदम हे सोमय्या यांना माहिती पुरवत आहेत, असा आरोपही संजय कदम यांनी केला आहे. कर्वे यांनी या क्लिप खोट्या असून त्याविरोधात आपण कायदेशीर दाद मागणार असल्याचे सांगितले. एकंदरीतच गल्ली पासून मुंबई पर्यंत शिवसेनेत कुरघोडीचे राजकारण सर्वसामान्य लोकांना पाहायला मिळते आणि आता या कुरवड्या लोकांपासून लपून राहिलेल्या नाहीत हे मात्र नक्की.



 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here