इंदापूर तालुक्यातील बहुचर्चित खोरोची दरोडा प्रकरणाचा छडा इंदापूर पोलिसांनी अवघ्या 72 तासात लावला. सदर तपासाकामी वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही लक्ष घालून योग्य मार्गदर्शन केले व आरोपींना बेड्या घालण्यात यश मिळाले. तपास पथकाने आरोपीबाबत माहिती काढण्याकरीता इंदापूर परिसरातील गोपनीय बातमीदारांना सक्रीय करून इंदापूर परिसरातच मुक्काम करून माहिती घेतली अशाप्रकारे गुन्हयाचा शोध सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा तुषार दादासो चव्हाण, वय २२ वर्षे, व्यवसाय मजुरी, राहणार फोंडशीरस, पाटीलवस्ती, ता. माळशीरस, जि.सोलापूर याने त्याचे जोडीदारासह केलेला आहे. त्या वरून दिनांक १६ रोजी त्यास ताब्यात घेऊन त्याचेकडे गुन्हयाचे अनुशंगाने विचारपुस केली असता. त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथिदार नामे रोहन उर्फ सोन्या शिवाजी जाधव, वय १९ वर्षे, रा. खोरोची, हनुमान चौक, ता. इंदापूर, जि. पुणे, आणि नितीन बजरंग जाधव, वय २७ वर्षे, रा. खोरोची खंडोबा मंदीराचे पाठीमागे, ता. इंदापूर, जि. पुणे यांच्यासह मिळून केला असल्याची माहिती दिली आहे.त्यानुसार तीनही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे.सदर गुन्हयाचे आत्तापर्यंत झालेल्या तपासादरम्यान अटक आरोपींकडून गुन्हयाबाबत माहिती घेतली असता त्यांनी माहिती दिली की, त्यांनी सर्वप्रथम एक वृध्द जोडपे एकटे राहत असल्याचे हेरले, त्यावेळी आरोपींना चुकीची माहिती मिळाली होती की, त्या वृध्द जोडप्यांकडे जमीनीच्या व्यवहारातून पैसे येणार आहेत. त्यामुळे आरोपींनी वृध्द जोडप्यास लुटण्याचा तीन महीन्यांपासून प्लॅन तयार केला व ते वयोवृध्द जोडपे घरासमोर झोपलेले असताना. त्यांना झोपेतच मारहाण करून महीलेच्या अंगावरील सोने व घरातील रोख रक्कम चोरली आहे.
दिनांक १३ डिसेंबर रोजीचे पहाटे मौजे खोरोची, ता. इंदापूर, जि. पुणे गावचे हद्दीत दयाराम नारायण कणीचे, वय ७० वर्षे व जनाबाई दयाराम कणीचे, वय ६५ वर्षे हे वयोवृध्द जोडपे त्यांचे राहत्या घरासमोर झोपलेले असताना अनोळखी इसमांनी लोखंडी रॉड व काठीने मारहाण करून त्यांना जबर जखमी केले होते.तसेच दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील मौल्यवान वस्तू चोरून नेल्या होत्या त्यांनी केलेल्या हल्यात दयाराम नारायण कणीचे, वय ७० वर्षे यांचा मृत्यु झाला होता.
त्याबाबत इंदापूर पोलीस स्टेशन येथे गु.रजि.नं.१०७६/२०२२, भा.दं.वि.कलम ३९७,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदरचा गुन्हा हा आरोपीने कोणताही सुगावा मागे न सोडल्याने गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर होते.
सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक अंकित गोयल. यांनी अप्पर पोलीस अधीक्षक आनंदराव भोईटे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व इंदापूर पो.स्टे.चे पो.नि.प्रदिप सुर्यवंशी यांचे नेतृत्वाखाली सहा पोलीस निरीक्षक सचिन काळे, पो. स.ई. अमित सिद पाटील, पो.स.ई. शिवाजी ननवरे, सहा फौज. बाळासाहेब कारंडे, सहा फौज. रविराज कोकरे, पो.हवा. सचिन घाडगे, पो.हवा.अभिजीत एकशिंगे, हवा. स्वप्निल अहिवळे, हवा. विजय कांचन, पो. हवा. एम. आय. मोमीन,हवा.अजित भुजबळ, पो.हवा.आसिफ शेख, पो. हवा. योगेश नागरगोजे, पो. हवा. चंद्रकांत जाधव, पो. हवा अजय घुले, पो.कॉ.धीरज जाधव, पो.कॉ.दगडु विरकर, चा. सहा फौज काशीनाथ राजापुरे, चा. पो. कॉ. अक्षय सुपे, तसेच इंदापूर पो.स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पो हवा. नानासाहेब आटोळे, पो. ना. सलमान खान, पो. कॉ. विशाल चौधर व सहा.फौज. शिवाजी निकम, वालचंदनगर पो.स्टे. अशी चार पथके नेमुण तपास सुरू केला होता.
सदरचा गुन्हाचा तपास पोलीस अधीक्षक अंकित गोयल. अप्पर पोलीस अधीक्षक आनंदराव भोईटे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली स.पो.नि. नागनाथ पाटील करीत आहे. एकंदरीतच गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 72 तासात आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलीस यंत्रणेला यश आल्यामुळे पोलिसांच्या कार्याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.
Home Uncategorized खोरोचीतील दरोडा प्रकरणाचा 72 तासात इंदापूर पोलिसांनी लावला छडा.स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुकास्पद...