इंदापुर(विशेष प्रतिनिधी संतोष तावरे):एरव्ही खादीत वावरणारे राजकीय लोक वाढदिवसाला लाखो रुपये खर्च करताना दिसतात, मात्र दोस्त जिवाभावाचा म्हणून सर्वत्र परिचित असणारे पुणे जिल्हा परिषद सदस्य श्री अभिजित तांबीले हे याला अपवाद असल्याचे दिसून आले.त्याला कारणही तसेच आहे , अभिजीत भैया तांबिले यांच्या जिल्हा परिषद मतदार संघातील मौजे-काटी या गावच्या गोडसे कुटुंबातील अपघात ग्रस्त काजल च्या शस्त्रक्रिये साठी आर्थिक मदतीची गरज होती ,अभिजीत तांबिले यांना ही माहिती समजताच त्यांनी त्यांच्या मित्रपरिवारास मदत करण्याचे आव्हान करताच ,मित्रपरिवाराने भरघोस असा प्रतिसाद दिला आणि अभिजीत भैय्या यांनी केलेल्या अहवानातून एक लाख 19 हजार रुपये एवढी भरघोस मदत मिळाली या मदतीमुळे काठी येथील गोडसे कुटुंबाला मोठा हात भार लागल्याने या पैशातून त्या बहिणीची शस्त्रक्रिया पार पडली .आत्ता त्या भगिनी ची प्रकृती उत्तम असून यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या अभिजीत भैया तांबिले दोस्त जिवाभावाचा यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. शनिवारी तांबिले यांनी अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटल मध्ये जाऊन काजल गवळी व नातेवाईकांची भेट घेतली. त्यांची विचारपूस केली त्या बहिणीच्या पोटा वरील शस्त्रक्रिया झाली असून तिची प्रकृती उत्तम असल्याचे यावेळी जनता एक्सप्रेस मराठी न्यूज ला बोलताना अभिजीत भैया तांबिले यांनी सांगितले. काटी गावातील गोडसे कुटुंबातील काजल गवळी यांचा काही दिवसांपूर्वी बावडा नजिक अपघात झाला सध्या त्यांच्यावर अकलूज येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांनी मोठा आर्थिक खर्च असल्याचे सांगितले होते मात्र एवढी रक्कम उभा करणे या कुटुंबासाठी मोठी चिंतेची बाब होती याच अनुषंगाने अभिजीत भैय्या तांबे यांनी आपल्या वाढदिवसा दिवशी मित्र परीवारासाठी पोस्ट टाकली माझ्या जन्म दिनानिमित्त आपण मला शुभेच्छा देणार आहात माजी सहकारी माझी वडीलधारी मंडळी हार, फेटा ,श्रीफळ, केक, तसेच येण्यासाठी गाडी ला लागणारे पेट्रोल-डिझेल जे काही खर्च करणार आहात, तो खर्च न करता आपण आपली सर्वांची बहीण काजल ताई गवळी यांना फूल ना फुलाची पाकळी मदत करावी, माझ्या जन्मदिनी शुभेच्छा रुपी जी काही मदत म्हणून फोन पे व गुगल पे वरती आर्थिक स्वरूपात मदत कराल ते माझ्यासाठी सर्वात मोठे गिफ्ट असेल, असे आव्हान करताच काही वेळातच लाखो रुपये जमा झाले त्यामुळे काजल यांच्यावर उपचार करण्यास आर्थिक मदत झाली ते म्हणजे अभिजित तांबिले यांनी वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून तो पैसा एका अपघातग्रस्त भगिनीच्या शस्त्रक्रियेसाठी खर्च केला ,यामुळेच अभिजित तांबिले यांचे खादीतील देवदूत व दोस्त जिवाभावाचा म्हणून सर्वत्र कौतुक होत आहे.