इंदापूर: शेतीमालास हमीभाव नसल्याने शेतकरी हा शेतीपूरक व्यवसायाकडे वळलेला आहे आणि या शेतीपूरक व्यवसायांपैकी दुग्ध व्यवसायास महाराष्ट्रामध्ये प्राधान्य दिले जाते. महाराष्ट्रसह देशात महागाई व बेरोजगारी वाढली आहे आणि याचा परिणाम गावागावात झालेला दिसून येतो. इंदापूर तालुक्यातील माळवाडी येथील बापू गार्डे या उच्चशिक्षित युवकाने नोकरी मिळत नसल्याने स्वतःचा व्यवसाय असावा म्हणून दूध व्यवसाय चालू केला. या व्यवसायासाठी त्यांनी लाखो रुपये कर्ज काढून व्यवसायाची निर्मिती केली परंतु दुधास योग्य भावना मिळाल्याने आता त्याने थेट मुख्यमंत्र्यांकडे खदखद व्यक्त करत खाजगी दूध संघाच्या मनमानीमुळे आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे असे पत्र त्यांनी लिहिले आहे याबाबत बापूने लिहिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,माझे शिक्षण एम.कॉम & जी. डी. सी.& ए. झाले असून नोकरी मिळत नसल्याकारणाने मी दुग्ध व्यवसाय करत आहे परंतु महाराष्ट्रातील खाजगी सहकारी दूध संघांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार दूध दर हा 34 केलेला आहे परंतु पूर्वी Fat 3.5 व SNF 8..5 च्या वरती व Fat 3.0 व SNF 8.0 पर्यंत 0.20 होता पण सध्या तो स्लॅब रेट प्रति SNF 1 रुपया व FAT 0.50 पैसे कमी केलेला आहे अशी मनमानी सर्वच सहकारी संघ खाजगी संघ करत आहेत व सरकारने दिलेल्या 34 रुपयाच्या जीआर ला केराची टोपली दाखवलेली आहे असच जर दूध संघ जर सरकारचे ऐकत नसतील सरकारच्याच निर्णयाचे पायमल्य करत असतील तर आमच्यासारख्या नवीन दूध उत्पादक यांना आत्महत्या करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. आम्ही दूध संघांना याची विचारणा केली तर सदरचे संघचालक चेअरमन लोक सांगत आहेत की जर अनुदान दिले तरच आम्ही चांगला दूध दर देऊ शकतो यावरती शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा येणाऱ्या परिस्थितीला सरकार जबाबदार असेल तरी सरकारने परिपत्रकामध्ये सुधारणा करून नवीन स्लॅबरेटचा आदेश काढण्यात यावा ही विनंती. अशा आशयाचे पत्र बापू गार्डे याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री यांच्याकडे ई-मेल द्वारे पत्र व्यवहार करून आपली खदखद व्यक्त केली आहे आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा संबंधित अधिकारी या खदखदिस काय उत्तर देतील हे पाहण्यास योग्य ठरेल.
Home Uncategorized खाजगी दूध संघाच्या मनमानीमुळे आत्महत्येची वेळ-इंदापूरच्या उच्चशिक्षित दुग्ध व्यवसायकाने केली मुख्यमंत्र्यांकडे खदखद...