कौठळी :आज दिनांक ११/११/२०२१ रोजी जि प प्राथमिक शाळा कौठळी येथे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली.त्याच बरोबर आज दुसऱ्या सत्राची सुरुवात झाली.जून मध्ये इयत्ता १ ली मध्ये दाखल झालेल्या मुलांचे स्वागत पण शाळा बंद असल्याने केले गेले नव्हते.त्या मुलांचे फुगे व चॉकलेट देऊन स्वागत शिक्षण दिनाचे औचित्य साधून आज करण्यात आले.शाळेतील उपशिक्षका आरती गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.नंदकुमार सूर्यवंशी सरांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या कार्याची माहिती दिली.भारत ननवरे सरांनी सुत्रसंचालन केले.मुलांनी भाषणे केली.या उपक्रमाचे कौतुक व्याहाळी केंद्राचे केंद्रप्रमुख संभाजी आजबेनी केले.