दि: 5 रोजी आयोजित करण्यात आलेल्या दै तुफान क्रांती वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला यावेळी अनेक कला शिक्षण कृषी सामाजिक राजकीय पत्रकारिता अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या व्यक्तीना कृषि उत्पन्न बाजार समिती सभागृह फलटण या ठिकाणी आदर्श सेवा सन्मान पुरस्कार सोहळा 2021 आयोजित करण्यात आले.यावेळी केंद्रीय पत्रकार संघाचे सातारा जिल्हा प्रवक्ता आणि साप्ताहिक बहिष्कृत चळवळ याचे निवासी संपादक राजेश पवार हिसरे ता करमाळा यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय केलेल्या कार्यासाठी दै तुफान क्रांती चे संपादक श्री मिर्झागाबिल मुजावर यांच्या हस्ते आदर्श सेवा सन्मान पुरस्कार, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले.
यावेळी श्री जावेद आतार उपसंपादक दै तुफान क्रांती, श्री गोविंद मोरे विभागीय उपसंपादक दै तुफान क्रांती तसेच धनकरुणा न्यूज चे मुख्य संपादक श्री सचिन मोरे,दै तुफान क्रांती प्रतिनिधी अमोल रणदिवे सुभाष भोसले शिवाजी भोसले बारामती लाईव्ह संपादक अमित बागडे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.